|  |  | 
|  |  | 
घुंगूर येथे वयोश्री योजनेतून 165 जेष्ठ नागरिकांची तपासणी — आनंदा दौलू कांबळे सोशल फाउंडेशनचा उपक्रम
घुंगूर (ता. शाहूवाडी) :
दिवंगत आनंदा दौलू कांबळे सोशल फाउंडेशन, घुंगूर व ग्रामपंचायत घुंगूर यांच्या संयुक्त विद्यमाने, सामाजिक कार्यकर्ते मा. सरदार कांबळे (कार्याध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – ता. शाहूवाडी) यांच्या वाढदिवसानिमित्त वयोश्री योजनेअंतर्गत जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
 या शिबिरात ६० वर्षांवरील १६५ जेष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली. योजनेअंतर्गत मानेसाठी, पाठीसाठी, कमरेसाठी आणि गुडघ्यासाठी सहाय्यक बेल्ट, तसेच वॉकर, काठी, कमोड खुर्ची आणि दिव्यांगांना व्हीलचेअर यांचे वाटप करण्यात येणार आहे.

शिबिराचे आयोजन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत आनंदा दौलू कांबळे यांच्या सामाजिक कार्याची परंपरा जपत करण्यात आले. या प्रसंगी लोकनियुक्त सरपंच सौ. शुभांगी कांबळे, ग्रामसेवक किशोर लगारे, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते सरदार कांबळे यांनी केले. या उपक्रमामुळे घुंगूर गावात सामाजिक बांधिलकी आणि ज्येष्ठांच्या सन्मानाचे उत्तम उदाहरण उभे राहिले आहे.
|  |  |  | 