डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये गौरी गीते स्पर्धा उत्साहात

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

डॉ.डी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या वतीने आयोजित स्पर्धांचा बक्षीस वितरण करताना सौ.शांतादेवी डी. पाटील सोबत प्राचार्य डॉ.महादेव नरके, सौ.प्रिया पाटील, प्रा. निलम रणदिवे, सौ.सुलोचना बागडी, प्रा.शीतला साळोखे, प्रा.एस.बी.शिंदे, धनराज वाडकर

कोल्हापूर – कसबा बावडा येथील डॉ.डी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या “हिरकणी मंच” तर्फे गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थिनींसाठी गौरी गीते स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धांचा बक्षीस समारंभ सौ. शांतादेवी डी. पाटील यांच्या हस्ते आणि प्राचार्य डॉ.महादेव नरके यांच्या उपस्थितीत झाला. रोख बक्षीस, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला.

यामध्ये झिम्मा, सूप नाचवणे,घागर नाचवणे, फुगडी, काटवट कणा, पायातील घोडा, छूई -फुई या स्पर्धांचा समावेश होता.२५० हून अधिक विद्यार्थिनींनी आपले कौशल्य दाखवत अत्यंत उत्साहाने या स्पर्धामध्ये सहभाग घेतला. झिम्मा स्पर्धेत हरसखी, जिजाऊ तारा,राजमुद्रा या संघानी बक्षिसे मिळवली. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. नरके यांनी पॉलिटेक्निकमधील हिरकणी मंचतर्फे आपली संस्कृती टिकावी आणि विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षी या स्पर्धा घेतल्या जात असल्याचे नमूद केले.

यावेळी श्रीराम संस्था माजी उपसभापती सौ. प्रिया पाटील, परीक्षक सुलोचना बागडी, हिरकणी मंच समन्वयक प्रा.नीलम रणदिवे, प्रा. शीतल साळोखे, प्रा.ऐश्वर्या पाटील, प्रा.एस.बी.शिंदे, प्रा.नेहा माने, प्रा.वैष्णवी पाटी तसेच ,माजी विद्यार्थी धनराज वाडकर यांच्यासह हिरकणी मंचमधील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.