मुंबईतील अभिरूप युवा संसदेत गौरव पाटील करणार कोल्हापूर जिल्हयाचे नेतृत्व…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

विजय बकरे

राज्यस्तरीय अभिरूप युवा संसद होणार कलिना कॅम्पस येथे संपन्न…

राधानगरी प्रतिनिधी – राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटणकर या ग्रामीण भागातील गौरव दगडू पाटील हा तरुण युवा संसदेत कोल्हापूर जिह्याचे नेतृत्व करणार आहे. विशेष म्हणजे नुकत्याच भारत सरकार द्वारे दिल्ली येथे झालेल्या “मेरी माती मेरा देश” या अमृत कलश यात्रेकरिता सुद्धा गौरव ची निवड जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आली होती. ही राज्यस्तरीय अभिरूप युवा संसद 19 व 20 नोव्हेंबर 2023 रोजी राजधानी मुंबई येथील मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस, सांताक्रुज येथे संपन्न होणार आहे.

या दोन दिवस चालणाऱ्या संसदेत विधानभवन, राजभवन, आणि मंत्रालयाच्या भेटीसुद्धा या माध्यमातून घेतल्या जाणार आहेत. गौरव च्या निवडीच कौतुक केले जात आहे. या निवडीचे श्रेय त्याने आईवडील आणि नेहरू युवा केंद्र कोल्हापूरच्या जिल्हा युवा अधिकारी पूजा सैनी मॅडम यांना दिले असल्याचे गौरव पाटील यांनी सांगितले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.