मोफत आरोग्य शिबिर, जीवन विकास सेवा संघ व ओतारी आई चॅरिटेबल फाऊंडेशनचा सामाजिक उपक्रम

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

चिपळूण:(पूजा पुजारी)

गणेशोत्सवाच्या उत्साहात समाजोपयोगी कार्याचा वारसा जपत जीवन विकास सेवा संघओतारी आई चॅरिटेबल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळूण येथील महाराजा गणेशोत्सव मंडळातर्फे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात डॉ. कुंदन ओतारी व डॉ. तेजस ओतारी यांनी भाविकांची तपासणी करून मोफत औषधोपचार केले. योगिता डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल, खेड यांच्या टीमने दंत तपासणी केली, तर ऑप्टिकल युनिव्हर्सच्या नेत्रतज्ज्ञांनी डोळ्यांची तपासणी केली.मानसशास्त्रज्ञ दिपक माळकरी यांनी मानसिक आरोग्य व समुपदेशनाचे महत्त्व पटवून देत ब्रेन बूस्टर कार्यक्रमाचे मार्गदर्शन केले.

संस्थापिका सौ. संगीता ओतारी म्हणाल्या, “आरोग्य, शिक्षण आणि संस्कार या तीन पायावर समाजाची खरी प्रगती उभी राहते. गरीब व वंचित घटकांपर्यंत या सेवा पोहोचवणे, तसेच स्वामी विवेकानंदांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.”

जीवन विकास सेवा संघ व ओतारी आई फाऊंडेशनने जाहीर केले आहे की, CSR फंडाच्या माध्यमातून कोकणात खालील प्रकल्प उभारले जातील, यासाठी विविध कंपन्या, देणगीदार यांच्याशी समन्वय सुरु आहे. 

जीवन विकास सेवा संघ व ओतारी आई फाऊंडेशनने स्पष्ट केले आहे की, CSR फंडाच्या माध्यमातून हे सर्व उपक्रम कोकणात कायमस्वरूपी उभारले जातील.आरोग्य, शिक्षण व संस्कार या त्रिसूत्रीवर आधारित सामाजिक विकासाचे हे नवे पर्व घडवण्याचा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे.

UPSC/ MPSC अभ्यास केंद्र

  • स्वामी विवेकानंद आश्रम

  • ध्यानधारणा व योगा केंद्र

  • हेल्थ सेंटर

  • संस्कार शिबिरे घेण्याचा मानस आहे. 

गणेशोत्सवात केवळ आरत्या, रोषणाई आणि मिरवणुका पुरेशा नाहीत… धार्मिकतेचे जसे महत्व आहे, तसेच आराेग्याचीही काळजी तितकीच महत्वाची आहे., समाजाला आपणही काहीतरी परत द्यायला हवे, देणं लागताे. ही भावना ठेवून,   जीवन विकास सेवा संघओतारी आई चॅरिटेबल फाऊंडेशनने हा संदेश दिला आहे. महाराजा गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित मोफत आरोग्य शिबिरात भाविकांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. त्यांचेही याकामी माेलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या सर्व कर्मचारी, अधिकारी वर्गाने लाभार्थींना उत्तमाेत्तम सेवा देत, तपासणी उत्कृष्ट केल्याची भावना उपस्थितांच्या मनात निर्माण झाली. आरोग्य, शिक्षण व संस्कार या त्रिसूत्रीवर आधारित हे उपक्रम कोकणातील सामाजिक विकासाचे नवे पर्व घडवतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

समाजात ठसा उमटवणारे उपक्रम सुरुच.

या संस्थेने यापूर्वी ही रक्तदान, वाचन संस्कार, वक्तृत्व, चित्रकला व रांगोळी स्पर्धा, ध्यान-मे‌डिटेशन कार्यशाळा, ब्रेन बूस्टर, शैक्षणिक मदत, आत्पकालीन परिस्थिती मदतीचा हात देण्याचे कर्तव्य पार पाडले आहे. अशा विविध कार्यक्रमांतून फाऊंडेशनने आधीच आपली छाप पाडली आहे. यापुढेही भविष्यात वैविध्यपूर्ण समाज, शैक्षणिक तसेच आराेग्यविषयक व ध्यानधारणा सारखे उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. 

या शिबिराला संगीता ओतारी, डॉ. कुंदन ओतारी, डॉ. तेजस ओतारी, मानसशास्त्रज्ञ दिपक माळकरी, आरोग्य विभागाच्या पूजा पुजारी, रविना पवार, पत्रकार यशवंत गोरीवले यांच्यासह आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
भाविकांनी या उपक्रमाचे कौतुक करताना “गणेशोत्सवातली खरी सेवा हीच!” असा प्रतिसाद दिला.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.