वीर शिवा काशीद यांच्या स्मारकाच्या नूतनीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

पन्हाळगडावरील वीर शिवा काशिद यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन

कोल्हापूर (विनायक जितकर) – वीर शिवा काशिद यांनी स्वराज्यासाठी दिलेले बलिदान अतुलनीय असून पन्हाळगडावरील त्यांच्या स्मारक परिसराच्या नूतनीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

वीर शिवा काशिद यांच्या पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्री. आबिटकर यांनी पन्हाळगडावरील वीर शिवा काशिद यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर नेबापूर झाडेचौकी येथील वीर शिवा काशिद यांच्या समाधीला दुग्धाभिषेक करुन अभिवादन केले. यावेळी उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, मुख्याधिकारी चेतन कुमार माळी, माजी नगराध्यक्ष आसिफ मोकाशी, अधिकारी, कर्मचारी व पन्हाळ्यावरील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री आबिटकर म्हणाले, वीर शिवा काशिद यांनी दिलेलं बलिदान मोलाचं असून त्यांच्या स्मारकाच्या अनुषंगाने आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती तसेच राज्य शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे सांगून हे स्मारक तरुण पिढीला प्रेरणा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पन्हाळगडाची भूमी छत्रपती शिवरायांच्या युद्धनीतीने आणि त्यांच्या वास्तव्याने आपल्याला प्रेरणा देत आहे. ज्यांच्या कार्याची नोंद भविष्यातही घ्यायला लागेल, असे व्यक्तिमत्व वीर शिवा काशिद यांचे होते. त्यांना अभिवादन करुन भविष्यकाळातही या परिसराच्या विकासासाठी, विशेषत: पन्हाळगडाच्या संपूर्ण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री आबिटकर यांनी यावेळी दिली.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.