पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
शिरपुर (प्रतिनिधी):- दिवंगत कन्हैयालाल गुमानजी मारवाडी यांच्या धर्मपत्नी, राजेश मारवाडी (दै.उज्ज्वल स्वतंत्र भारत), गोपाल मारवाडी (दै. भास्कर, ब्युरो चीफ धुळे, भारतीय पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष) तसेच हरिलाल जुलवानी (मुख्याध्यापक न.पा.प्राथ. शाळा) यांच्या मातोश्री आणि चि. तुषार, कपिल, कुणाल, चंद्रगुप्त, पियुष यांची आजी श्रीमती शांतीदेवी उर्फ शांताबाई कन्हैयालाल मारवाडी यांचे गुरूवारी दीर्घ आजार व वृद्धापकाळाने निधन झाले. गुरुवारी दुपारी शिरपूर येथील त्यांच्या निवासस्थानापासून अंत यात्रा काढण्यात आली.
अंत यात्रेत सामाजिक, धार्मिक, पत्रकारिता आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘अमरधाम’ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. थोरले सुपुत्र गोपाल मारवाडी यांनी मुखाग्नि दिला. अंत्यसंस्काराप्रसंगी विश्व हिंदू महासंघ, किसान विकास फाउंडेशन व भारत राष्ट्र समिती तर्फे ओंकार आबा जाधव,मोहन साहेबराव पाटील, भारतीय जनता पार्टी व खंडेराव मंदिर ट्रस्ट तर्फे संजय आसापुरे, काँग्रेस सेवादल व होमगार्ड संघटना आणि बारा बलुतेदार संघटने तर्फे सुभाष लोहार यांसह विविध संघटनांच्या वतीने श्रद्धांजली वाहिली. आपल्या मनमिळाऊ, प्रेमळ, धार्मिक आणि परोपकारी स्वभावामुळे त्या सर्वांच्याच प्रिय ‘आई’ म्हणून सुप्रसिद्ध होत्या.त्यांच्या जाण्याने सर्व समाजातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.त्यांच्या गंधमुक्तीचा कार्यक्रम सोमवार दि 27 रोजी शिरपुर जिल्हा धुळे येथील अग्रसेन भवनात आयोजित करण्यात आला आहे.*
गंधमुक्तीचा कार्यक्रम सोमवार दि 27/11/ 2023 रोजी अग्रसेन भवन,करवंद नाका येथे संध्या.4:00 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.