जनता दलचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांचे निधन…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

समाजवादी पार्टी, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेकडून आदरांजली…

कोल्हापूर – जनता दल प्रदेश अध्यक्ष शरद पाटील यांना विनम्र श्रध्दांजली जनता दल (सेक्युलर) चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या निधनाने राज्यातील समाजवादी चळवळीचे फार मोठे नुकसान झाले आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज या विधानसभा मतदारसंघातून प्रस्थापितांना धोबपछाड करून ते दोन वेळा विधानसभेवर निवडून गेले होतें. नंतरच्या काळात हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने ते विधान परिषदेवर निवडून गेले. इ. स. २००२ मध्ये झालेल्या पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपा नेते प्रकाश जावडेकर यांना पराभूत केले होते.

समाजवादी विचारावरील निष्ठा अन् सामाजिक बांधिलकीचा त्यांनी आपल्या राजकीय व सामाजिक जीवनात कधीच विसर पडू दिला नाही. प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करीत असताना त्यांनी सर्वांना सोबत घेऊन काम केले. त्यांच्या नेतृत्वाखाली जनता दल (से) महाराष्ट्र प्रदेश प्रधान महासचिव म्हणून १६ वर्षे काम करण्याची संधि मिळाली. यावेळी त्यांनी दिलेली साथ व सहकार्य अत्यंत मोलाचे होतें. सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी, कामगार, शेतमजूर, हमाल, अल्पसंख्याक, दलित, सामान्य व गरीबांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे नेते म्हणून ते सर्वपरिचित होते.

आज 27/12/2023 रोजी पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने समाजवादी चळवळीचे व माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांचे व लाखो गरीब जनतेचे फार मोठे नुकसान झाले आहे. समाजवादी पार्टी, समाजवादी परिवार आणि महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना यांच्या वतीने मी त्यांना विनम व भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो.

प्रताप होगाडे
प्रदेश कार्याध्यक्ष,
समाजवादी पार्टी, महाराष्ट्र व
अध्यक्ष, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना


पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.