देशभर साईमंदिरे बांधायला निघालेल्या साईसंस्थान विरोधात जनक्षोभ

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

जगताप दाम्पत्याचे आमरण उपोषण, सर्वपक्षीय शिर्डीकरांचा पाठिंबा

शिर्डी: साईभक्त, साईसंस्थान कर्मचारी व शिर्डी शहराच्या समस्या कायम ठेऊन देशभर साईमंदिर बांधायला निघालेल्या साईसंस्थानच्या विरोधात जनक्षोभ उसळला आहे.माजी नगराध्यक्षा अनिता जगताप व माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप या पती-पत्नीने संस्थानच्या निर्णयाच्या विरोधात साईमंदिरा समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. जगताप दाम्पत्याला पाठिंबा देण्यासाठी सर्वपक्षीय शिर्डीकरांनी वज्रमुठ बांधली आहे.
गुरूवारी सकाळी ११ वाजता साईमंदिराच्या महाद्वार क्रमांक चार समोर या उपोषणाला सुरूवात करण्यात आली. तत्पुर्वी भजनी मंडळींबरोबर उपोषणस्थळी येत उपोषणकर्ते व ग्रामस्थांनी साईबाबांची आरती केली. साईसंस्थानचे सीईओ पी. शिवा शंकर यांच्या निषेधाच्या घोषणा देत त्यांना येथून बदली करण्याची मागणी करण्यात आली.

शिर्डीतील भाविंकांच्या समस्या कायम आहेत. रूग्णालयात डॉक्टर व औषधांचा तुटवडा आहे. संस्थान महाविद्यालयात प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. कंत्राटी कर्मचारी गेल्या तीन वर्षांपासून दहा हजारावर कुटूंब चालवतायेत, भाविकांच्या मनोरजंनाच्या सुविधा तशाच रेंगाळत आहेत. येथील

कारभार निट चालवण्याऐवजी संस्थान बाहेर मंदिरे बांधणे व निधी देण्याचा उद्योग करत असल्याबद्दल सर्वच नेत्यांनी संताप व्यक्त केला.साईभक्तांच्या समस्या मार्गी लागल्याशिवाय व शिर्डीचा विकास झाल्याशिवाय साईबाबांच्या झोळीतील एकही रूपया बाहेर जावू देणार नाही असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी उपोषणकर्ते अनिता जगताप व विजय जगताप यांच्यासह आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेले माजी नगराध्यक्ष कैलास कोते, शिवाजी गोंदकर, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, रविंद्र गोंदकर, सुजीत गोंदकर आदी नेत्यांनी साईसंस्थान विरोधातील असंतोषाला वाट मोकळी करून दिली.

अर्चनाताई कोते, संस्थानचे माजी विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर, माजीउपनगराध्यक्ष सुजीत गोंदकर, जगन्नाथ गोंदकर, हरिश्चंद्र कोते, रविंद्र गोंदकर, नितीन उत्तम कोते, ताराचंद कोते़, रमेशराव गोंदकर, आप्पासाहेब कोते, नितीन अशोक कोते, अभिजीत कोते, दत्तात्रय कोते, कोंडाजी कांदळकर, सचिन शिंदे, समीर शेख, प्रकाश गोंदकर, वैभव कोते, तान्हाजी गोंदकर, सचिन वाणी, राजेंद्र कोते, किरण कोते, अक्षय तळेकर, अविनाश गोंदकर, रविंद्र कोते, सुनील गोंदकर, दिनकर कोते, जावेद शेख, माजी नगरसेविका वैशाली गोंदकर, पुजा गोंदकर, वंदना म्हस्के, संगिता जगताप, मिनाक्षी डुबल, सुरेखा सोनवणे, आशा कोतकर, रेखा कदम, वासंती राहणे, प्रज्ञा गुंजाळ, प्रतिभा रासणे, पदमा भालेराव आदींनी उपोषणस्थळी येवून आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला. उपोषणस्थळी दिवसभर नागरीकांचा ओघ सुरू होता.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.