अखेर कोल्हापूरला मिळाले आयुक्त, आता प्रतीक्षा पदभार स्वीकारण्याची…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कोल्हापूर महानगरपालिका आयुक्तपदी श्रीमती मंजू लक्ष्मी…

कोल्हापूर – कोल्हापूर महानगरपालिकेचे गेली अडीच महिने आयुक्त पद रिक्त असल्याने कोल्हापूरला लवकरच आयुक्त द्यावे अशी मागणी माजी मंत्री व सध्याचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी शासनाला केली होती. याची दखल घेऊन शासनाने कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती मंजू लक्ष्मी यांची कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या येत्या दोन दिवसात पदभार स्वीकारणार असल्याचे समजते.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे कोल्हापूरला स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण साठी आले होते. त्यावेळी कोल्हापूरला लवकरच आयुक्त दिला जाईल अशी घोषणा त्यावेळी केली होती. त्याची दखल घेऊन कोल्हापूर महानगरपालिकेला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मंजू लक्ष्मी यांची आयुक्त पदी नियुक्ती केली आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.