फये ल. पा. प्रकल्पाच्या मुख्य गळती थांबल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

गतवर्षी केलेल्या कामामुळे ३ पाणी आवर्तनाऐवजी ७ पाणी आवर्तने देण्यात यश – जलसंपदा विभाग

गारगोटी प्रतिनिधी – फये लघु पाटबंधारे प्रकल्प, ताभुदरगड हा प्रकल्प मोजे फये या गावच्या मोरओहोळ नाल्यावर सन २००५ मध्ये बाधण्यात आला असून सन २००५ पासून पूर्ण क्षमतेने धरणात पाणीसाठा करण्यात येत आहे. धरणाची साठवण क्षमता १३८.८८ दलघफू असून एकूण १२ बंधाऱ्यावर ७०० हेकटर सिंचन क्षेत्र आहे.

फये ल. पा. प्रकल्पाच्या मुख्य गळतीचे काम आमदार प्रकाश आबिटकर यांनी १ कोटी ९० लाखाचा निधी उपलब्ध करुन सन २०२२ मध्ये पूर्ण करण्यात आलेले असून सदर कामामुळे विमोचक विहिरीला असणारी गळती पूर्णपणे थांबलेली आहे. त्यांमुळे यापूर्वी शेतक-यांना मिळणा-या ३ पाणी आवर्तनाऐवजी 7 पाणी आवर्तने देणे शक्य झाले असून शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. गतवर्षीच्या मुख्य विमोचकाच्या दुरुस्ती कामामुळे धरणातून वाया जाणारे ६५ % पाणी थांबविण्यात यश आले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना ४ पाणी आवर्तने ज्यादाची देणे शक्य झालेले आहे. सद्यस्थितीत धरणाला कोणत्याही प्रकारचा धोका नसून शेतक-यांना घाबरण्याचे कारण नसल्याचे जलसंपदा विभागाकडून प्रसिध्दीपत्रक काढून सांगितले आहे.

प्रकल्पाच्या विमोचक विहीरीच्या अधोबाजूस नलिकेच्या उजव्या बाजूने पाणी थोड्या प्रमाणात जात असल्याचे निदर्शनास आलेनंतर मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, नाशिक व केंद्रीय जल तथा विद्युत अनुसंधान, पुणे यांचेकडून उपाययोजना करण्यासाठी क्षेत्रीय भेटी घेण्यात आल्या असून, त्या अनुषंगाणे सखोल अभ्यास सुरु आहे व याबावत अहवाल आल्यानंतर यावर लवकरात लवकर उपाययोजना करणेत येईल असे सांगितले आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.