कृती समितीने काढली महापालिकेची…! नेमकं काय घडलं, अधिकाऱ्यांवर ओढले ताशेरे

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

शिक्षक दिनी कृती समितीने महापालिकेचा केला अनोखा निषेध

महापालिकेत केलं प्रतीकात्मक आदर्श शिक्षक पुरस्कारचे वितरण

पुरस्काराची घोषणा मात्र वितरण नाही

कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीकडून महानगरपालिकेचा निषेध

 

अधिक बातमीसाठी यु.. ट्युबवर व्हिडीओ पहा. 

काेल्हापूरः मागील पाच वर्षापासून कोल्हापूर महानगरपालिकेने आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केले, परंतु प्रत्यक्षात त्या शिक्षकांना पुरस्कार प्रदान केला गेलाच नाही. शिक्षकांची अशी चेष्टा करणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाचा कोल्हापूर शहर व जिल्हा नागरि कृती समिती कोल्हापूर यांच्या वतीने पालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रतिकात्मक आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण करून निषेध व्यक्त केला.

पाच सप्टेंबर हा दिवस सर्वत्र शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो. शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना त्यांनी केलेल्या शैक्षणिक कामाच कौतुक करून पुढेही नव्या उमेदीने काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून प्रत्येक वर्षी महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने प्रत्येक वर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो. गेल्या पाच वर्षापासून महापालिकेकडून आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केले ,मात्र ते पुरस्कार संबंधित शिक्षकांना प्रदानच केले नाहीत. असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अशा या प्रकाराने कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी शिक्षकांची मस्करी केली असल्याची प्रतिक्रिया कृती समितीचे अशोक पोवार यांनी दिलीय. यावेळी रमेश माेरे यांनी कठाेर शब्दात महापालिका तसेच अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढत, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तसेच शिक्षण विभाग कसा नाकर्ता आहे. त्यांना शिक्षकी पेशाची कशी कदर नाही, यावर परखड प्रतिक्रीया देत, महापालिका विभाग काम करण्यासाठी सक्षम नाही.. त्यांची … नाही असे मत व्यक्त केले. महादेव पाटील ,राजाराम कांबळे, महादेव जाधव, श्रीधर पाटील ,अवधूत रुग्वेकर,निखिल जांभळे, प्रकाश कोडोलीकर, लहुजी शिंदे, इस्माईल गडवाले, कादर मलबारी प्रसाद बुलबुले फिरोज खान उस्ताद दीपक गौड यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.