शनिवारी, रविवारी महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

ऑनलाइन पध्दतीने विनामर्यादा वीजबिलाचा भरणा…

कोल्हापूर – चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी २३ व रविवारी २४ रोजी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. थकबाकीदार ग्राहकांनी थकीत बिलांचा भरणा न केल्यास वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईला वेग देण्यात आला आहे. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकबाकी तसेच पुनर्जोडणी शुल्क अधिक जीएसटीचा भरणा केल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येत आहे.

कोल्हापूर व सांगली जिल्हयातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील १ लाख ७४ हजार वीजग्राहकांकडे १८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये कोल्हापूर ९ कोटी (७० हजार ४०० ग्राहक) आणि सांगली जिल्ह्यात ८ कोटी ८५ लाख रुपयांची (१ लाख ३ हजार ग्राहक) थकबाकी आहे. वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी वीजग्राहकांनी थकीत बिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे महावितरणचे आवाहन आहे.

वीजग्राहकांना www.mahadiscom.in या वेबसाईटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पध्दतीने विनामर्यादा वीजबिलाचा भरणा करता येतो. या व्यतिरिक्त महावितरणने पाच हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी आवश्यक माहितीचा तपशिल संबंधित ग्राहकांच्या वीजबिलावर उपलब्ध आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.