आयुष्मान भव योजना ग्रामीण रुग्णालयात प्रभावीपणे राबवा – आमदार प्रकाश आबिटकर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

विनायक जितकर

राधानगरी ग्रामीण रुग्णालयात आयुष्यमान भारत योजने अंतर्गत आयुष्मान भव योजना… 

राधानगरी – आयुष्यमान भारत योजने अंतर्गत आयुष्मान भव योजना राधानगरी ग्रामीण रुग्णालयात प्रभावीपणे राबवा असे प्रतिपादन आमदार आबिटकर यांनी केले. ग्रामीण रुग्णालय राधानगरी येथे 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत आरोग्य योजनेच्या माध्यमातून रुग्णांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे आवाहन यावेळी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना म्हणाले की येत्या दोन दिवसात ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टेमची सोय उपलब्ध करून दिली जाईल. तसेच 2 ऑक्टोबर रोजी ग्रामीण रुग्णालयात डायलिसीस विभाग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आगामी काळात या ग्रामीण रुग्णालयात 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारणीसाठी आपण प्रयत्न करू असेही आमदार आबिटकर यांनी सांगितले.

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणपती गवळी यांनी या योजनेच्या मुख्य उद्देश या बद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच गोकुळ संचालक अभिजित तायशेटे, संभाजी आरडे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष विलास रणदिवे, माजी सरपंच विजय ढेरे, अनिल बडदारे, सतिष फणसे, सचिन पालकर, मयूर पोवार, मंगेश चौगुले, पिरळचे सरपंच संदीप पाटील, प्रा. चंद्रशेखर कांबळे, विलास डवर, विक्रम पालकर पंढरीनाथ खांडेकर यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी, व्यापारी व नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.