२१ हजार ग्राहकांना मिळणार अखंडित वीज; घाटगे-पाटील उपकेंद्रात ३३/११ केव्हीचा नवीन ब्रेकर कार्यान्वित

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

३३/११ केव्ही घाटगे-पाटील उपकेंद्रात
नवीन ब्रेकर कार्यान्वित ;
२१ हजार ग्राहकांना अखंडित वीज

कोल्हापूर : अखंडित वीज पुरवठ्याकरिता ३३/११केव्ही घाटगे पाटील उपकेंद्रामध्ये नवीन ३३ केव्ही ब्रेकर कार्यान्वित करण्यात आला आहे. नवीन ब्रेकर उभारणी केल्यामुळे ह्या भागातील जवळपास २१ हजार ग्राहकांना अखंडित, सुरळीत वीजसेवा मिळणार आहे. ग्राहकांसाठी ही दिवाळीची भेट ठरली आहे.

३३/११ केव्ही एमआयडीसी मुख्य विद्युत वाहिनी ही २२०/३३ केव्ही अति उच्चदाब मुडशिंगी उपकेंद्रातून निघते. तिच्याद्वारे पुढे घाटगे पाटील,शाहू मिल व विद्यापीठ या तीन ३३/११ केव्ही उपकेंद्रांना विद्युत पुरवठा केला जातो. या वाहिनीद्वारे उचगाव- सरनोबतवाडी, कोल्हापूर शहरातील शाहूपुरी, शिवाजी विद्यापीठ, सायबर या परिसरातील ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. आता ब्रेकर कार्यान्वित झाल्याने तांत्रिक बिघाड वा नियमित दुरुस्तीवेळी एकावेळी तीनही उपकेंद्रामधील बंद होणारा वीजपुरवठा आता नियंत्रित करता येणार आहे. केवळ दुरूस्ती काम करावयाचे असलेल्या उपकेंद्राचा वीज पुरवठा बंद ठेऊन इतरांना सुरळीत वीजपुरवठा देता येणार आहे. त्यामुळे इतर भागातील ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.अधीक्षक अभियंता श्री.अंकुर कावळे,कार्यकारी अभियंता सुनिल माने यांचा मार्गदर्शनाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंता (कोल्हापूर पूर्व उपविभाग) नितीन धुमाळ व सहकाऱ्यांनी कामकाज पाहिले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.