पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
कोल्हापूर : “देश स्वतंत्र आहे… पण स्वच्छ, हिरवा, सुंदर ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे” — हाच संदेश देत रॉबिन हूड आर्मी, कोल्हापूर यांनी १ ते १५ ऑगस्ट दरम्यान संपूर्ण भारतभर सुरू असलेल्या मिशन संकल्प-७८ अंतर्गत सलग तीन प्रभावी उपक्रम राबवले.
पहिला टप्पा — हरिताचा शपथविधी : जरगनगर येथील कोल्हापूर महानगरपालिका जरग हायस्कूलच्या अंगणात रॉबिन्स, मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन वृक्षारोपण केले. प्रत्येक रोपटं म्हणजे उद्याच्या हिरव्या कोल्हापूरची बीजं… ती रोवतांना मुलांच्या डोळ्यांत चमक होती आणि हातांत मातीचा सुगंध.
दुसरा टप्पा — जनजागृतीची गाडी रस्त्यावर: शहरातील ऑटो रिक्षांवर मिशन संकल्प-७८ चे स्टिकर लावून ड्राईव्ह घेण्यात आली. रिक्षा थांबल्या, नागरिक पुढे आले, मोहिमेचा संदेश प्रत्येक वाचनात, प्रत्येक नजरेत पोहोचू लागला.
तिसरा टप्पा — स्वच्छतेचा जयघोष : ऐतिहासिक रंकाळा तलाव परिसरात रॉबिन्स आणि महानगरपालिका स्वच्छता कर्मचारी यांनी खांद्याला खांदा लावून मोठी स्वच्छता मोहीम राबवली. घामाने अंग ओली, पण मनात समाधान. ठिकठिकाणी “स्वच्छ कोल्हापूर – सुंदर कोल्हापूर” या बॅनरची उभारणी करून प्रत्येकाला आवाहन — “हे फक्त आमचं मिशन नाही, हे तुमचंही वचन आहे.”
या तीन दिवसांच्या प्रयत्नांतून रॉबिन हूड आर्मीने कोल्हापूरला एक संदेश दिला — परिवर्तन रस्त्यावर नाही, आपल्या हातात आहे. आणि हा संदेश आता शहरभर पसरत आहे.
307
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.