डॉ. राजेंद्र बनसोडे यांची सब-ज्युनिअर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी तांत्रिक समिती अधिकारी म्हणून निवड

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

अ‍ॅमॅच्युअर कबड्डी फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आणि अ‍ॅमॅच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने स्पर्धेचे आयोजन

कोल्हापूर – कोल्हापूर येथील शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूल, मुक्त सैनिकचे क्रीडा शिक्षक व राष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. राजेंद्र बनसोडे यांची राष्ट्रीय सब-ज्युनिअर कबड्डी स्पर्धेसाठी तांत्रिक समिती अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.

ही स्पर्धा दि. ३१ जानेवारी २०२६ ते २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आळंदी, पुणे येथे होणार असून, अ‍ॅमॅच्युअर कबड्डी असोसिएशन ऑफ पुणे व अ‍ॅमॅच्युअर कबड्डी फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आणि अ‍ॅमॅच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत देशभरातून ५४ मुले व मुलींचे संघ सहभागी होणार आहेत. डॉ. बनसोडे यांच्या निवडीबद्दल संस्थेचे पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मा. वृषाली कुलकर्णी, शिक्षकवृंद, सेवक व कबड्डीप्रेमी यांच्याकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

सदर स्पर्धेसाठी अ‍ॅमॅच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी मा. श्री. ए. उशी रेड्डी, अ‍ॅमॅच्युअर कबड्डी फाउंडेशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष मा. नामदार श्री. गिरीश महाजन, जनरल सेक्रेटरी सौ. भारती जगताप तसेच अनेक राष्ट्रीय मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.