डॉ. डी. वाय. पॉलिटेक्निक संघाला बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

स्पर्धेत १६ अभियांत्रिकी पदविका संघ सहभागी…

कोल्हापूर – इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक संघाने विजेतेपद पटकावले. विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक संघातील खेळाडूंचा सत्कार करताना डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील, ट्रस्टी आ. ऋतुराज पाटील या स्पर्धेत १६ अभियांत्रिकी पदविका संघ सहभागी झाले होते.

अंतिम फेरीत डी. वाय. पॉलिटेक्निक संघाने गव्हर्मेंट पॉलिटेक्निक रत्नागिरी या संघावर २-० असा सलग सेट मध्ये विजय मिळवला. विजयी संघात प्रथमेश मोरे, अथर्व शिंदे, यश पाटील, हेत छाबिया यांचा समावेश आहे. डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, ट्रस्टी आ. ऋतुराज पाटील यांच्या हस्ते विजयी संघातील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. महादेव नरके, जिमखाना विभागप्रमुख प्रा.अक्षय करपे, रजिस्ट्रार सचिन जडगे ,सूरज जाधव उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.