हजारो सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात मासिक सत्संग, स्वामी नामजपासाठी संस्कार वह्यांचे प्रकाशन

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

बहुजन हिताय – बहुजन सुखाय हीच सेवामार्गाची भूमिका : गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे

नाशिक (प्रतिनिधी): समर्थ सेवेकरी परिवाराने बहुजन हिताय बहुजन सुखाय याच भूमिकेतून जनहित साधावे असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांनी केले तेव्हा उपस्थित हजारो सेवेकर्‍यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट आणि स्वामीनामाचा जयजयकार करून आसमंत दणाणून टाकला.

सेवामार्गाचा मासिक सत्संग श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठामध्ये देश विदेशातून आलेल्या हजारो सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत नुकताच उत्साहात पार पडला. यावेळी गुरुमाऊलींनी समस्त सेवेकरी परिवाराला संबोधित केले. ते म्हणाले की, सेवामार्गाची भूमिका जनहित, राष्ट्र कल्याण, विश्वशांती, संस्कृती आणि धर्म रक्षणाची आहे. त्याच उद्देशाने सेवामार्गातर्फे बहुविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.सध्या सेवेकऱ्यांकडून करवून घेण्यात येत असलेली अब्जचंडीची सेवा देखील धर्म,राष्ट्र आणि जनकल्याणासाठीच आहे. हाच धागा पकडून त्यांनी सांगितले की, सेवेकर्‍यांनी लोकांना समस्यामुक्त करण्यासाठी समय दान द्यावे. ज्ञानदान आणि अन्नदानापेक्षा दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाणे म्हणजेच समय दान देणे फार महत्त्वाचे आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा

सेवामार्गाने शाडू माती आणि गोमयापासून बीज गणेश मूर्ती तयार केली आहे. या मूर्तीमध्ये आयुर्वेदिक बिया आहेत. त्यामुळे मूर्तीचे पाण्यात विसर्जन करू नये त्याऐवजी चांगल्या जागेत खड्डा खाणावा आणि त्यामध्ये गणेश मूर्तीचे रोपण केल्यास कालांतराने त्यातून आयुर्वेदिक रोपे उगवतील आणि पर्यावरण रक्षणाला हातभार लागेल शिवाय नद्यांचे प्रदूषणही होणार नाही असे त्यांनी नमूद केले.

संस्कार वह्यांचे उत्साहात प्रकाशन

सेवेकऱ्यांना फावल्या वेळेत बारा लक्ष श्री स्वामी समर्थ जप लिहिण्यासाठी संस्कार वह्यांचे आणि श्री स्वामी समर्थ मार्गदर्शिका २०२६ चे प्रकाशन परमपूज्य गुरुमाऊलींच्या हस्ते यावेळी करण्यात आले. मोठी, मध्यम आणि लहान अशा स्वरूपात संस्कार वह्या उपलब्ध आहेत .ऑक्टोबर महिन्याचा मासिक सत्संग गाणगापूर येथे घेण्यात येणार असून त्यावेळी या वह्या जमा कराव्यात असे आवाहन करण्यात आले.

सर्व संप्रदायांना एकाच छताखाली आणणा

अध्यात्मक कार्यरत असलेल्या सर्व संप्रदायांना एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न आहे त्या दृष्टीने लवकरच एक कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे सुतोवाच गुरुमाऊलींनी केले. यावेळी गुरुपुत्र श्री चंद्रकांतदादा मोरे, श्री. नितीनभाऊ मोरे ,श्री आबासाहेब मोरे हेही उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.