जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन…
बिद्री – मजरे कासारवाडा येथील शेतकरी व बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक युवराज वारके हे शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात यातूनच त्यांनी ए. आय. टेक्नॉलॉजीची मदत घेत सेंद्रिय शेती करत आहेत.
कृषी विभाग व कृषी आत्मा, कृषी महाविद्यालय यांच्या मार्गदशनाखाली शेतकरी युवराज वारके यांनी केलेल्या सेंद्रिय शेतीची पाहणी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज केली. शेतकरी युवराज वारके यांनी बसवलेल्या ए. आय. टेक्नॉलॉजीची सर्व माहिती जिल्हाधिकारी येडगे यांनी घेतली. युवराज वारके यांनी राबविलेल्या या उपक्रमाला शेतकरी व ग्रामस्थांनी सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे निश्चितच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक नवी वाट, नवी दिशी देणारी असेल, याचा आदर्श सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवहान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. या यशस्वी प्रयाेगानंतर मजरे कासारवाडचा हा संकल्पपूर्तीचा प्रकल्प म्हणजे एक बँडअँम्बेसिडर म्हणूनच पुढे येईल असे जिल्हाधिकारी म्हणाले.
यावेळी जिल्हा परिषद सी. ई. ओ. कार्तिकेयन एस, तहसीलदार अनिता देशमुख, गट विकास अधिकारी सर्जेराव पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक ए. वाय. पाटील, उपविभागीय कृषि अधिकारी अरुण भिंगारदिवे, तालुका कृषी अधिकारी रमेश गायकवाड, मंडल कृषी अधिकारी सरवडे दिलीप आदमापूरे, कृषि पर्यवेक्षक के एस कोंडे, कृषी सहाय्यक युवराज सावंत, प्रदीप गोगाने, जयदिप पाटील, कृष्णात जाधव, कृष्णात एकल, प्रकल्प व्यवस्थापक आत्मा सुनिल कांबळे, तालुका कृषी आत्मा कमिटी सदस्य सचिन वारके, सरपंच योगिता वारके, उपसरपंच संजय सुतार, ग्रामसेवक सचिन बारड, ग्रामपंचायत सदस्य सुहास वारके, विक्रम वारके, आनंदा खोत, सुनिल वारके, मानसिंग वारके, रघुनाथ फराकटे, दिगंबर जितकर, सुधीर वारके, अनिल वारके, उत्तम साठे यांच्यासह गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












































