भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांची वडगावला सदिच्छा भेट

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांची वडगावला सदिच्छा भेट

स्थानीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष मोहन माळी यांच्याशी सविस्तर चर्चा

शिरोली (प्रतिनिधी) –
भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी पेठवडगाव शहरास सदिच्छा भेट दिली. ही भेट माजी नगराध्यक्ष मोहन माळी यांच्या निवासस्थानी झाली. या भेटीत वडगाव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा झाली.

मोहन माळी यांनी आपल्या समर्थकांसह भाजप प्रवेशाबाबत खासदार महाडिक यांच्याशी प्राथमिक चर्चा केली. यावर महाडिक यांनी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. तसेच भाजप पदाधिकाऱ्यांना वडगाव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीस तातडीने लागण्याचे आवाहनही केले.

या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करणे, नव्या इच्छुकांचा पक्षप्रवेश, तसेच सर्वांना एकत्र घेऊन निवडणुकीसाठी तयारी करण्याची जबाबदारी वडगाव शहर भाजप मंडळ अध्यक्ष अमरसिंह पाटील आणि युवा मोर्चाचे विश्वास माने यांच्यावर सोपवण्यात आली.

या वेळी मोहन माळी, अमोल हुक्केरी, रमेश शिंपणेकर, शरद गुरव, कमलेश शिरवडेकर (मामा), संतोष ताईगंडे, अभय यादव, दिनेश सणगर, भाजप अध्यक्ष अमरसिंह पाटील, विश्वास माने, तय्यब कुरेशी, सलीम मोमीन, धनंजय गोंदकर, राजेंद्र जाधव, राजकुमार मिठारी, रघुनाथ पिसे, विजूभाई शहा, बबलू मोरे, निलेश कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.