पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
शिराेली- रुपेश आठवले/ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्या दिवसाची पवित्र आठवण म्हणून दरवर्षी पेटवडगाव ते माणगाव अशी धम्मचक्र परिवर्तन रॅली आंबेडकर अनुयायांच्या वतीने उत्साहात आयोजित केली जाते. याच पार्श्वभूमीवर शिरोली सांगली फाटा येथे आमदार अशोकराव माने यांनी सदिच्छा भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण केला तसेच फुलांचा वर्षाव करून अभिवादन केले.
यावेळी शिरोली पोलीस स्टेशनचे पीआय सुनील गायकवाड, शिरोली गावचे युवा नेते कृष्णात करपे, सतीश माळगे, सचिन समुद्रे, विद्याधर कांबळे, अमित खांडेकर, विवेक नागावकर, सागर कांबळे यांच्यासह शिरोली व परिसरातील अनेक आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅलीदरम्यान वातावरण उत्साहपूर्ण झाले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमानंतर सर्व उपस्थित बांधवांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. सामाजिक बंधुभाव आणि समानतेचा संदेश देणारी ही रॅली यावर्षीही भव्य स्वरूपात पार पडली.
रॅलीदरम्यान वाद्यांच्या गजरात आणि घोषणांच्या निनादात अनुयायांनी समानतेची मशाल उंचावत “जयभीम” चा गजर केला. तिरंगा व बौद्ध ध्वज हातात घेऊन निघालेल्या बांधवांच्या उत्साही सहभागामुळे संपूर्ण परिसरात ऐतिहासिक दिवसाचे स्मरण ताजे झाले.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.