प्रभू राम मंदिर लोकार्पण आनंदोत्सवाचा प्रसाद घरोघरी पोहोचवा – ना. हसन मुश्रीफ

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील एक लाख कुटुंबापर्यंत आनंदोत्सवाचा प्रसाद पोहोचविणार…

कागल – अयोध्येतील प्रभू राम मंदिर लोकार्पण आनंदोत्सवाचा प्रसाद घरोघरी पोहोचवा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील एक लाख कुटुंबापर्यंत आनंदोत्सवाचा प्रसाद पोहोचविणार, असेही ते म्हणाले.

कागलमध्ये प्रभू राम मंदिराच्या आवारात पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. या आनंदोत्सवानिमित्त नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघातील एक लाख कुटुंबांमध्ये प्रभू राम व अयोध्या येथील प्रभू राम मंदिराचा फोटो असलेली कापडी पिशवी, आनंदोत्सवाचा प्रसाद म्हणून अर्धा किलो साखर, दिनदर्शिका, मंत्री मुश्रीफ यांनी बांधलेल्या ७०० मंदिरांची पुस्तिका, लाडू आणि कागलमध्ये होणाऱ्या सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका समाविष्ट आहे. या वाटपाचा शुभारंभ मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाला.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने सबंध भारतवासियांची गेल्या अनेक वर्षाची प्रतीक्षा संपत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते लोकार्पण होत असलेल्या या मंदिर आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यामुळे संपूर्ण देशासह जगात आनंदोत्सव साजरा होत आहे. या निमित्ताने सोमवार २२ रोजी कागलमध्येही भजन, कीर्तन, प्रवचन, टाळ -मृदंगाचा गजर, अयोध्येतील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण असे भव्य- दिव्य सांस्कृतिक कार्यक्रम जल्लोषात होणार आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा.

ज्येष्ठांना अयोध्या दर्शन… यावेळी पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, अयोध्येच्या या सोहळ्यानंतर मतदार संघातील जे ज्येष्ठ नागरिक अयोध्येला जाण्याची इच्छा व्यक्त करतील, त्यांना आयोध्येचा मोफत प्रवास आणि प्रभू राम मंदिर दर्शन घडवून आणू यावेळी पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते प्रभू राम मंदिरात आरती, उपस्थित बारा बलुतेदार नागरिकांना रामबंधन आणि प्रसादाच्या एक लाख पिशव्यांचा वाटप शुभारंभ झाला.

यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, जेष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन दिंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय चितारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास पाटील आदी प्रमुख व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.