दूध संस्थावर जाणीवपूर्वक होणारी कारवाई थांबवावी… दूध संस्था कर्मचाऱ्यांच्या वतीने सहाय्यक निबंधक(दुग्ध) यांना निवेदन…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

दूध उत्पादकांचे आर्थिक नुकसान होण्याचा धोका…

कोल्‍हापूर – कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या वतीने शुक्रवार ०९/०२/२०२४ रोजी कोल्हापूर सहकारी संस्था (दुग्ध) चे सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे व वैधमापनचे निरीक्षक संजय सावंत यांना जिल्ह्यातील दूध संस्थावर जाणीवपूर्वक होणारी कारवाई तात्काळ थांबवणे बाबतचे निवेदन ताराबाई पार्क येथील सहाय्यक निबंधक (दुग्ध)च्या कार्यालयात देण्यात आले.

या निवेदनामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सहकारी दुग्ध व्यवसाय तळागाळात रुजलेला असून हा व्यवसाय जिल्ह्यातील दूध उत्पादकांचा उत्पनाचा मुख्य स्त्रोत आहे. आज गोकुळमार्फत दर दहा दिवसाला जवळपास ८५ कोटी रुपये दूध बिलापोटी गावातील दूध संस्थेच्या माध्यमातून दूध उत्पादकांना दिले जातात. गावोगावी असणाऱ्या सहकारी दूध संस्थांच्या माध्यमातून दूध उत्पादकांना आर्थिक दृष्टया सक्षम करण्याचे काम सुरू आहे. या सर्व दूध संस्था शासन नियमानुसार, NDDB व गोकुळने घालून दिलेल्या कार्यप्रणालीप्रमाणे गेली कित्येक वर्ष दूध उत्पादकांच्या विश्वासावरती पारदर्शी कामकाज करत यशस्वी वाटचाल करीत आहेत.

परंतु गेले काही दिवसापासून काही संघटनामार्फत दुग्ध व्यवसाय व दूध संस्था कामकाजाची वस्तुस्थिती समजून न घेता विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन दूध संस्थांच्या कामकाजाविषयी विनाकारण आक्षेप घेतले जात आहेत. त्या अनुषंगाने दूध संस्थावर धाडी टाकण्यात येत आहे. व कामकाजातील क्षुल्लक त्रुटी काढून दूध संस्थांना नोटीसा देण्यात येत आहेत. यामुळे दूध उत्पादक व दूध संस्था यांच्यामध्ये गैरसमज होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने १) ०१/०२/२०२४ रोजी प्राथमिक दूध संस्थांच्या दैनंदिन कामकाजाबाबतचे संदर्भिय परिपत्रक काढलेले आहे ज्याची प्रत अद्याप दूध संस्थांना मिळालेली नाही. तरीही संस्थावर धाडी टाकण्यास सुरुवात का केली? २) अन्य घटकांना (अशासकीय) सोबत घेऊन शासकीय यंत्रणेकडून दूध संस्थावर धाडी का टाकल्या जातात? ३) फक्त गोकुळ दूध संघाशी संलग्न दूध संस्थावरच कारवाई का ? असे संघटनेच्यावतीने प्रश्न उपस्थित करण्यात आले.

दूध संस्थांच्या कामकाजमध्ये दुधाची सॅम्पल किती घ्यावी, वजन काट्याची अॅक्युरसी व संस्थेचे कामकाज या बाबतची परिपत्रके वेळोवेळी गोकुळमार्फत दूध संस्थेना दिलेली आहेत. व आमच्या संघटनेने सदर परिपत्रकांची अंमलबजावणी करणेबाबत सर्व दूध संस्थांना आवाहन केले आहे. त्याप्रमाणे संस्था पातळीवरती कामकाज सुरु आहे. तथापि संस्था कामकाजबाबत तपासणी वेळी आमचे कडून शासकीय यंत्रणेस सर्वतोपरी सहकार्य करणेत येईल. सध्या सुरु असलेल्या धाड सत्रामध्ये दूध संस्थांना येणाऱ्या अडचणीचा कोणीही विचार केलेला नाही. या सर्व बाबीचा संस्था कामकाजावरती विपरीत परिणाम होऊन संस्था आर्थिक दृष्ट्या अडचणीत येऊन संस्था बंद पडतील पर्यायाने दूध उत्पादकांचे आर्थिक नुकसान होण्याचा धोका आहे. सहकारी दूध संस्था टिकवणेसाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. दूध संस्था कामकाजाचा अभ्यास करून त्रुटी असतील तर सुधारणा करणेसाठी वेळ देऊन सहकार्य करावे व वरील सर्व बाबींचा सहानुभूती पूर्वक विचार करून सध्या दूध संस्थावर टाकण्यात येत असलेल्या धाडी त्वरित थांबविण्यात याव्यात असे लेखी निवेदन देण्यात आले.

यावेळी उपस्थित सहाय्यक निबंधक (दुग्ध) प्रदीप मालगावे, वैधमापनचे निरीक्षक संजय सावंत, कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील, उपाध्यक्ष शामराव पाटील, सचिव विश्वास पाटील, संदीप पानारी, शिवाजी शिंदे, सुरेश जाधव, संजय हळदकर, तानाजी गुरव, दत्तात्रय पाटील तसेच दूध संस्थांचे सचिव, कर्मचारी आदी उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.