डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या दोघांना खेलो इंडियामध्ये कास्यपदक

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

24 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत जयपूर येथे खेलो इंडिया स्पर्धा संपन्न

कोल्हापूर – जयपूर राजस्थान येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 मध्ये डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे खेळाडू अथर्व गंगाराम पाटील, रणवीर अजितसिंह काटकर यांनी 10 मीटर एअर रायफल या प्रकारात कांस्य पदक पटकावले.

24 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत जयपूर येथे खेलो इंडिया स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये 10 मीटर एअर रायफल या प्रकारात सांघिक गटातून अथर्व गंगाराम पाटील, रणवीर अजितसिंह काटकर यांनी दमदार कामगिरी नोंदवत कांस्यपदक जिंकले. अथर्व पाटील हा सिव्हिलच्या तृतीय वर्षाचा तर रणवीर काटकर हा आर्किटेक्चर शाखेचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. त्यांना अधिष्ठाता आणि जिमखाना प्रमुख डॉ. राहुल पाटील, क्रीडा संचालक इजाज गडकरी यांचे मार्गदर्शन लाभले.

अथर्व व रणवीरने मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटी, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे यांनी अभिनंदन केले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.