डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी घेतला दुर्गभ्रमंतीचा रोमांचक अनुभव

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

७० हून अधिक विद्यार्थ्यानी दुर्गभ्रमंतीचा आनंद घेत इतिहास जाणून घेतला

कोल्हापूर – कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘अ‍ॅडवेंचर क्लब’तर्फे प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ट्रेकिंगचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ७० हून अधिक विद्यार्थ्यानी सातारा जिल्ह्यातील वसंतगड (कराड) व दातेगड (पाटण) येथे दुर्गभ्रमंतीचा आनंद घेत इतिहास जाणून घेतला.

प्रा. योगेश चौगुले व प्रा. सनराज बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या १६ नोव्हेंबर रोजी आयोजित या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जन्मस्थळाला भेट देत ऐतिहासिक महत्त्व जाणून घेतले. वसंतगड येथे गणेश मूर्ती, चंद्रसेन मंदिर, किल्ल्याचे बुरुंज, गोमुख आदी स्थळांचे निरीक्षण केले, तर दातेगड येथे विद्यार्थ्यांनी दुर्गभ्रमंतीचा रोमांचक अनुभव घेतला.

या उपक्रमासाठी डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे आणि विभाग प्रमुख प्रा. नवनीत सांगळे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.