CRIME – एक लाख रुपयासाठी क्रीडा अधिकाऱ्याने केला झोल; मात्र लाचलुचपत विभागाने त्यालाच केला गोल..!

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

अरविंद सावरतकर

लाखाची लाच स्वीकारताना कोल्हापूरच्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यास अटक…

कोल्हापूर – लाखाची लाच स्वीकारताना कोल्हापूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी सापडले एक लाख दहा हजाराची रक्कम स्वीकारताना डॉ. चंद्रशेखर साखरे यांना लाच लचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे या कारवाईमुळे क्रीडा क्षेत्रासह अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

कोल्हापूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर विश्वनाथ साखरे (रा.आई निवास 156/2 प्लॉट नंबर 5, राजगुह हौसिंग सोसायटी, वृंदावन व्हीला शेजारी विश्रामबाग, सांगली) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केलीय. जिल्हा क्रीडा कार्यालयातचं ही कारवाई करण्यात आल्यामुळं क्रीडा क्षेत्रात खळबळ माजलीय. याबाबतची माहिती अशी, तक्रारदार हे वेगवेगळ्या सरकारी विभागास साहित्य पुरवठा करण्याचं काम करतात. त्यांनी कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयास आवश्यक असलेले साहित्य हे ऑनलाइन महा टेंडर वरती आलेल्या जाहिरातीनुसार पुरवले होते.

या साहित्याचे एकूण बिल हे 8,89,200/- रुपये झाले होते. हे बिल मंजूर करण्यासाठी साखरे यांनी तक्रारदार यांच्याकडे बिल रकमेच्या अंदाजे 15 टक्के प्रमाणे लाच मागणी केली. तडजोडीअंती 1,10,000 /- लाचेची मागणी करून ती लाच रक्कम आरोपी साखरे यांनी तक्रारदार यांचेकडून स्वतः स्वीकारल्याने त्यांना रंगेहात त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या विरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.