पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर मध्ये काल दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकी दरम्यान एक गंभीर घटना घडली दुर्गादेवी विसर्जन सुरू असताना तेथे मिरवणुकसाठी आणलेला जनरेटरचा पेट्रोल पाईप अचानक लिकहोऊन पेट्रोलनी आग पकडली या आगीमध्ये मिरवणुकीत सामील दहा मुले गंभीरित्या भाजली आहेत. घटनेनंतर त्वरित जखमी मुलांना महाबळेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले परंतु त्यातील काही मुले अति गंभीर स्वरूपात भाजली असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सातारा व पुणे येथे हलवण्यात आले आहे.घटनास्थळाच्या प्रत्यकक्षदर्शीच्या माहितीनुसार ही मुले पेट घेतलेल्या जनरेटरच्या बाजूला बसली होती आणि मुले लहान असल्यामुळे घटनेतून ते स्वतःचा बचाव करू शकले नाहीत सदर मुलेही पाच ते सात वयोगटातील आहेत यातील तीन मुलांना पुणे येथे हलवण्यात आल्याने दुर्गामाता मंडळासह स्थानिकांना चिंता लागली आहे सदर घटनेचा सीसीटीव्ही देखील आता समोर आला आहे याबाबत स्थानिक महाबळेश्वर पोलिस आधिक तपास करत आहेत.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.