सीपीआर; शेंडा पार्क येथील विविध विकास कामे दर्जेदार व नियोजित वेळेत पूर्ण करा – मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर- छ. प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय व शेंडा पार्क येथे आरोग्य विषयक जी विविध विकासकामे सुरू आहेत ती दर्जेदार आणि नियोजित वेळेत पूर्ण करण्यात यावीत असे स्पष्ट निर्देश ,वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. शेंडा पार्क येथील राजर्षी छ. शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात श्री मुश्रीफ यांनी प्रलंबित कामाचा आढावा घेतला.
यावेळी वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे, सार्व. बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता तुषार बुरुड, वैद्यकीय अधिक्षक डॉ. भूषण मिरझे बांधकाम समितीचे अध्यक्ष डॉ .अनिता सैबनवार सचिव डॉ. शिशिर मिरगुंडे, सदस्य गिरीश कांबळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. सध्यस्थितीत सीपीआरच्या कंपाउंडची उंची कमी आहे. ती वाढवण्याचा प्रस्ताव पीडब्ल्यूडीकडे द्या .शाहू स्मारकाकडील गेट हे इन गेट करा तर सर्किट बेंचकडील आउट गेट करा जेणेकरून वाहतुकीची (ट्राफिक) समस्या जाणवणार नाही. सीपीआरच्या परिसरातून काही किरकोळ साहित्य चोरीला गेले आहे. त्याची जबाबदारी संबंधितावर निश्चित करून यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी असे निर्देश देवून नार्गाजून कंन्सट्रक्शन कंपनी (NCC) द्वारे अकराशे बेडच्या हॉस्पिटलची उभारणी सुरू असून या कंपनीच्या सिमेंट बल्करना बांधकाम स्थळी येण्यासाठी पर्यायी रस्ता तयार करण्यात यावा अशी सूचनाही श्री मुश्रीफ यांनी केली.
वेदगंगा इमारतीतील दोन मजले तसेच 30 तारखेपर्यंत दूधगंगा इमारतीतील पहिल्या मजल्यावरील रूग्ण स्थलांतरीत करून या इमारती नूतनीकरणासाठी उपलब्ध करून दिल्या जातील असे डॉ. गिरीश कांबळे म्हणाले यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता आशिष पाटील यांनी, या इमारती रिकाम्या झाल्यानंतर 45 दिवसात त्या नुतणीकरण करून देण्यात येतील याची ग्वाही दिली . या बैठकीसाठी प्रशासकीय अधिकारी मानसिंग जगताप नवनाथ बनसोडे, समीर मोमीन, डॉ संजय देसाई, डॉ अक्षय बाफना, अनुष लोखंडे, श्री तोंदले यांच्यासह संबधित ठेकेदार व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.