स्वतःला समृद्ध होण्यासाठी स्वतः प्रयत्न करा-सुभाष बिरांजे

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

संशोधित साहित्य वाचनाने माणूस समृद्ध होतो

शिक्षण विस्ताराधिकारी सुभाष बिरांजे यांनी व्यक्त केले मत

अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन प्रशिक्षणाचा सांगता समारंभ जनता विद्यालय तुर्केवाडी येथे संपन्न

चंदगड -शुभांगी पाटील

स्वतःला समृद्ध होण्यासाठी स्वतः प्रयत्न केले पाहिजेत. स्वतःच्या समृद्धीतेसाठी वाचन खूप महत्त्वाचे असून जगाच्या बाजारात स्वतःचे मत मांडण्यासाठी आज प्रत्येकाने सक्षम असले पाहिजे जे संशोधित साहित्य वाचतात त्यांच्यावर त्यांच्या विचाराचा प्रभाव घडून माणूस समृद्ध होतो. असे मत शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष बिरांजे यांनी व्यक्त केले. चंदगड पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत आयोजित अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन या तिसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणाच्या सांगता समारंभाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. एन. येळूरकर हे होते.सुरुवातीला शाहू पाटील यांनी प्रस्ताविकातून गेल्या पाच दिवसाच्या प्रशिक्षणाचा आढावा घेत तज्ञ मार्गदर्शक दशरथ अतिवाडकर, प्रशांत मगदूम ,श्रीमती मनीषा गावडे यांच्या कार्याचा गौरव गौरव केला.

प्रमुख पाहुणे शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष बिरांजे म्हणाले ज्याने समतेचा झेंडा रोवला त्या शाहू राजाचे विचार जिल्ह्यात विसरून चालणार नाही. शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी कायदा करून शिक्षणाचा प्रसार करण्याचे खरे काम शाहू महाराजांनी केलेले आहे. त्यांचे संशोधित केलेला इतिहास आज विद्यार्थ्यांच्या समोर येणे गरजेचे आहे .यासाठी शिक्षकाने स्वतः वाचनाकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तर गेल्या पाच दिवसात प्रशिक्षणातून आपल्याला काय मिळाले याबाबत राजकुमार करडी, युवराज कांबळे ,सुद्धा चतुर, संगीता जळगेकर यांनी मनोगते व्यक्त केली .केंद्र समन्वयक बीआरसी Chan तज्ञ सुनील पाटील यांनी या प्रशिक्षणाचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे आभार अनिल शिवणगेकर यांनी मानलं.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.