हिमोग्लोबीन वाढविण्यासाठी लोहयुक्त आहाराचे सेवन करावे-संजय पाटील

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

हलकर्णी महाविद्यालयात हिमोग्लोबिन तपासणी शिबीर

हलकर्णी येथील गुरुवर्य गुरुनाथ वि. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी हिमोग्लोबिन तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले या शिबीरासाठी माणगांव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका मा. शुभांगी पाटील प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होत्या. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दौलत विश्वस्त संस्थेचे उपाध्यक्ष  संजय पाटील हे होते. या वेळी मार्गदर्शन करताना मा. शुभांगी पाटील म्हणाल्या, – “आपल्या शरीरातील हिमोग्लोबीन वाढविण्यासाठी लोहयुक्त आहाराचे सेवन करावे. त्याचबरोबर आहारात मासे, सोयाबीन, अंडी, सुकामेवा, हिरव्या पालेभाज्या, बीट, गाजर यांचा संतुलित वापर नियमीत करावा फास्टफुड खाने शक्यतो टाळावे, योग्य प्रमाणात शरीरात हिमोग्लोबीन असेल तर शरीरात प्राणवायु वाहुन नेण्याचे काम योग्य रितीने चालते”.

अध्यक्षीय भाषणात  संजय पाटील म्हणाले की विद्यार्थ्यांनी वेळोवेळी आरोग्य तपासणी करुन घ्यावी. फास्टफुड ऐवजी घरचे ताजे जेवण सेवन करावे. नियमित व्यायाम व संतुलित आहार ने व्याक्तीमत्व सुदृढ बनते.यावेळी माणगांव प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणीसाठी मा. शुभांगी पाटील, शालन वर्पे, सतीश झाजरी या टिमने विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आर. एच. काझी यांनी केले. यावेळी 200 मुलींची तपासणी करून त्यांना प्रमूख पाहुणे म्हणून लाभलेल्या शुभांगी पाटील यांनी मार्गदर्शन केलं.यावेळी व्यासपीठावर प्राचार्य:- डॉ. बी. डी. अजळकर, उपप्राचार्य:- प्रा. एच. के. गावडे, प्रा. आर. बी. गावडे हे उपस्थित होते. तसेच प्रा. सी. एम. तेली, प्रा. एन. के. जावीर, प्रा. एम. बी. कांबळे, प्रा. जे. एम. उत्तुरे, प्रा. जयश्री पाटील, प्रा. एस. वाय. आखळी उपस्थित होत्या. उपस्थितांचे आभार प्रा. गितांजली पाटील यांनी मानले तर सुत्रसंचालन इंद्रायणी पाटील यांनी केले.

सध्याचे सुरू असलेले राजकारण हे तुम्हाला प्रतिष्ठेचे व सत्याचे वाटते का?

View Results

Loading ... Loading ...

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.