सत्यवान विचारे
तक्रार होताच गोकुळ दुधाचे दर एका गावा पुरते कमी…
संगमेश्वर – गोकुळ संघांचे सेल मार्केटचे प्रमुख शिरीष खोपडे आणि प्रोडेक्शन प्रमुख हेमंत पाटील यांचे विक्रेत्त्यांवर कारवाईचे आश्वासन अखेर फोल ठरले. संगमेश्वर तालुक्यात गोकुळ दुधाची चढया दराने विक्री या दैनिक सागर आणि सोशल मीडिया वरील वृत्ताची दखल खुद्द गोकुळ संघाने घेतली आणि चढया दराने विक्री करणाऱ्या दुकान दारावर कारवाई करण्याचे संकेत दिले. अर्धा लिटरला तीस ऐवजी सत्तावीस रुपये तर म्हशीच अर्धा लिटर अडतीस ऐवजी छत्तीस रुपये जिल्ह्यात मात्र जैसे थै परिस्थिती आहे.
कारवाईचे संकेत मिळताच तालुक्यातील फणसवणे गावातील दुधाचे दर प्रति लिटर सहा रुपयाने कमी करण्यात आले, मात्र जिल्ह्यातील दुधाचे दर नेहमी प्रमाणेच असून गेली चार वर्ष गोकुळ संघाच्या नावाने जिल्ह्यातील विक्रेते ग्राहकांची लूट करत आहेत. आणि वजनकाटा तपासणीस विभाग मात्र बघ्याच्या भूमिकेत असल्याचे बोलले जात आहे. आता पर्यंत वजन काटे तपासणीस विभागाने कधीही दुध विक्रेत्यावर कारवाई केल्याचे बोलले जात नाही, सारं कस ‘तेरी भी चूप मेरी भी चुप या प्रमाणे बिनबोभाट सुरु आहे.
या संबंधित गोकुळ संघाच्या सेल मार्केट प्रमुख शिरीष खोपडे यांनी विक्रेत्यांवर कंपनी कारवाई करेल असे आश्वासन दिले होते, तसेच गोकुळ संघांचे प्रोडेक्शन हेड हेमंत पाटील यांनी देखील पत्रकार सत्यवान विचारे यांच्याशी दूरध्वनी वरून चर्चा करुन आपण ग्राहक न्यायालयात जाऊनये आम्हास चार दिवस द्या, आम्ही काहीतरी तोडगा काढतो असे आश्वासन दिले होते, मात्र आज आठ दिवस झाले तरी गोकुळ संघाने कोणतेच पाऊल उचलले नाही. त्यामुळे शुक्रवारी ऑल जर्ना लिस्ट अँड फ्रेंड सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेतर्फे ग्राहक न्यायालयात आणि जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या कडे लेखी तक्रार करुन दाद मांगण्यात येणार असल्याचे संघटनेचे सचिव बाळकृष्ण कासार, खजिनदार सत्यवान विचारे यांनी जाहिर केले आहे.
गोकुळ संघ आपल्या होलसेल विक्रेत्यांना पाठीशी घालत असून किरकोळ व्यापाऱ्यांना मूळ किंमती पेक्षा मुळातच चढ्यादराने दुध खरेदी करावे लागत असल्याने त्यांना जादा दराने दुध विकावे लागत आहे. या साऱ्या प्रकाराला वजन काटे तपासणीस विभाग पाठिंबा देत असल्याने या मधे बंद पाकिटाची किमया असल्याचे बोलले जात आहे.