संस्थेचे अध्यक्ष मा. अर्जुन आबिटकर सर यांच्याहस्ते अदितीचा सत्कार
गारगोटी – युवा ग्रामीण विकास संस्था संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न श्री. आनंदराव आबिटकर कृषी महाविद्यालय पाल (गारगोटी) येथील तृतीय वर्षातील विद्यार्थिनी कु.अदिती पाटील हिची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये 48 किलो वजन गटांमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले असून तिची राष्ट्रीयस्तरीय कुराश स्पर्धेसाठी निवड झालेली आहे…ही स्पर्धा 3 जानेवारी पासून पटना येथे घेण्यात येणार आहे.
संस्थेचे अध्यक्ष मा. अर्जुन आबिटकर सर, प्राचार्य मिलिंद पांगिरेकर सर , अवधूत परुळेकर सर प्राचार्य डॉ. गोसावी, वरिष्ठ सहा प्राध्यापक डॉ. मोहिते महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व इतर शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत आबिटकर नॉलेज सिटी मध्ये अदितीचा सत्कार संध्याध्यक्ष मा. अर्जुन आबिटकर सर यांच्याहस्ते करण्यात आला व पटना येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


















































