सेवा पंधरवड्यात आरोग्य शिबिर
पेठ वडगाव (हातकणंगले)रुपेश आठवले:
भारतीय जनता पार्टी वडगाव मंडलातर्फे सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात 255 लोकांनी आरोग्य तपासणी करून घेतली. नेत्र तपासणीमध्ये 105 जण सहभागी झाले असून त्यापैकी 85 जणांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तसेच 9 जणांवर मोतीबिंदूची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
शिबिराचे अध्यक्षस्थान मंडलाध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी भूषविले. या वेळी भाजप कोल्हापूर जिल्हा पूर्व अध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, जिल्हा पूर्व उपाध्यक्ष संजय माळी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विश्वास माने, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तय्यद कुरेशी, माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, माजी तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील, जय कराडे, नाना जाधव, दीपक ढाले, राजेंद्र जाधव, सुदाम इंगवले, डॉ. अभय यादव, सागर कांबळे, सलीम मुलानी, अमोल होकिरे, राजेंद्र मुळीक, सुरेश पाटील, विकास कांबळे, भगवान पाटील, अमर पाटील, संपत बोने, उदय चाळके, सौ. संजीवनी पाटील, सौ. बानू नदाफ, प्रथमेश शिंदे, निलेश कांबळे, सचिन पाटील, भावेश शहा तसेच भाजप शक्ति केंद्रप्रमुख, बुथप्रमुख व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत डॉ. अभय यादव यांनी केले. प्रास्ताविक विश्वास माने यांनी मांडले तर आभार प्रदर्शन पी. डी. पाटील यांनी केले.