कसबा बावड्यात ३ कोटीच्या जलतरण तलावाचे भूमिपूजन…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

विनायक जितकर

आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांची प्रमुख उपस्थिती भूमिपूजन…

कोल्हापूर – कसबा बावडा पॅव्हेलियन मैदान परिसरात सुमारे 3 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या जलतरण तलावाचे भूमिपूजन आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून कसबा बावडा पॅव्हेलियन मैदान परिसरात 3 कोटी रुपये खर्चून स्विमिंग टॅंक उभारण्यात येणार आहे. या तलावाच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी जागेची पाहणी करून कामाची माहिती घेतली.

यावेळी माजी महापौर स्वाती येवलुजे, माजी नगरसेविका माधुरी लाड, माजी नगरसेवक मोहन सालपे, अशोक जाधव, सुभाष बुचडे, डॉ संदीप नेजदार, श्रावण फडतारे, श्री राम सोसायटीचे चेआरामन हिंदुराव ठोंबरे, व्हाईस चेआरमन सविता रणदिवे, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, अरुणकुमार गवळी, पूर्णेनंद्र गूरव, कंत्राटदार अजय पाटील, अर्णव पाटील, सागर येवलुजे, संजय लाड यांच्यासह कसबा बावडा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.