कोल्हापूर, : उज्वल कोल्हापूर संघटनेतर्फे मुख्यमंत्री तसेच उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देऊन येत्या २८ सप्टेंबर रोजी शहीद-ए-आझम भगतसिंह यांच्या जयंतीस शासकीय सुट्टी घोषित करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. महात्मा गांधी आणि टिळकांना मान, मग भगतसिंह का नाही?संघटनेचे प्रमुख गणेश संजय लाड यांनी निवेदनात नमूद केले की, “महात्मा गांधी जयंती व टिळक पुण्यतिथीस शासकीय सुट्टी दिली जाते. मात्र देशासाठी हसत-हसत प्राणार्पण करणाऱ्या क्रांतीवीर भगतसिंह यांना तोच सन्मान राज्य शासनाने द्यावा.” Bhagat Singh Jayanti नव्या पिढीत रुजेल देशभक्तीलाड यांनी पुढे सांगितले की, जर शासनाने भगतसिंह जयंती शासकीय सुट्टी म्हणून घोषित केली, तर शाळा, महाविद्यालये व सरकारी कार्यालयांमार्फत त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा प्रसार करणारे विविध कार्यक्रम घेता येतील. यामुळे नव्या पिढीत देशभक्तीची ठिणगी प्रज्वलित होईल व राष्ट्रनिष्ठेचा भाव अधिक बळकट होईल. शासनाने दुर्लक्ष केले तर तीव्र आंदोलन-Maharashtra Government Holidayलाड यांनी इशारा दिला की, “शासनाने मागणीकडे दुर्लक्ष केल्यास संघटनेला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडावे लागेल. ज्या मातीने भगतसिंह जन्माला घातला त्या मातीत आपण जन्मलो आहोत… म्हणून गप्प बसणार नाही.” अशा भावनिक शब्दांत त्यांनी शासनाला सजगतेचा इशारा दिला. मान्यवरांची उपस्थिती-Ganesh Sanjay Lad Kolhapurया निवेदन सादरीकरण वेळी संघटनेचे गणेश लाड, अजित पाटील, यशवंत शेळके, संजय चव्हाण, प्रसाद पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. |