१२,५०० चात्यांचा प्रकल्प वर्षभरात कार्यान्वित करण्याचा पालकमंत्र्यांचा निर्धार
गारगोटी (विनायक जितकर) – राधानगरी भुदरगड तालुक्याचा औद्योगिक चेहरा बदलणाऱ्या शरद सहकारी सुतगिरणीच्या नुतन नेतृत्वाची निवड एकमताने पार पडली. चेअरमनपदी ज्येष्ठ व सहकार क्षेत्रातील अनुभवी नेते बाबुराव सर्जेराव देसाई (आण्णा) यांची निवड झाली तर व्हा. चेअरमनपदी अशोक मारुती फराकटे यांची निवड करण्यात आली. यावेळी मतदार संघातील प्रमुख उपस्थित होते.
ही निवडणूक वस्त्रोद्योग विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती उज्वला पळसकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. निवड प्रक्रियेत प्रा. अर्जुन आनंदराव आबिटकर यांनी चेअरमन पदासाठी बाबुराव देसाई यांचे नाव सुचविले व सुभाष चौगले यांनी अनुमोदन दिले. तर व्हा. चेअरमन पदासाठी जयवंत चोरगे यांनी अशोक फराकटे यांचे नाव सुचवून संजय अनंत पाटील यांनी अनुमोदन दिले.
निवडीनंतर नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार राज्याचे आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी मंत्री आबिटकर म्हणाले “शरद सहकारी सुतगिरणी ही तालुक्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी एक महत्वाकांक्षी योजना आहे. आम्ही ती अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित उभारणार आहोत. पहिल्या टप्यात १२,५०० चात्यांचा प्रकल्प वर्षभरात कार्यान्वित करू. यामुळे युवकांना रोजगाराची दारे खुली होतील आणि तालुक्यातील औद्योगिक स्वप्न साकार होईल.”
या निवडीवेळी प्रा. अर्जुन आबिटकर, यशवंत नांदेकर, धैयशील भोसले, शहाजी देसाई, अनंत पाटील, रंगराव मगदूम, अतुल पाटील, रामचंद्र शिऊडकर, दादासो पाटील, उमाजी पाटील, सुनिल जठार, बाळकृष्ण भोपळे, महादेव खोत, उमेश तेली, सौ. वैशाली डवर, सौ. विजया देसाई आदी संचालक उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया सहाय्यक अधिकारी एम. एम. नरुटे आणि अवधूत परुळेकर यांनी केली.
तसेच या प्रसंगी ज्येष्ठ नेते के. जी. नांदेकर, कल्याणराव निकम, दत्ताजीराव उगले, नंदकुमार सूर्यवंशी सरकार, अरुण जाधव, जालंदर पाटील, अंकुश चव्हाण, सूर्याजी देसाई, अशोकराव भांदिगरे, निवासराव देसाई, शिवाजी ढेंगे, संदिप व्डेकर, विजय बलुगडे, संग्रामसिंह सावंत, संजय पाटील भादवण, तानाजी चौगले (राधानगरी), डॉ. सर्जेराव कवडे, अमित देसाई यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.