हातकणंगले पंचायत समिती सभापतीपदी अश्विनी बिरांजे, उपसभापतीपदी संतोष कांबळे बिनविरोध

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

शिवसेना-भाजप महायुतीचे स्पष्ट बहुमत; प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार

हातकणंगले (प्रतिनिधी – रुपेश आठवले) – हातकणंगले पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या अश्विनी बिरांजे तर उपसभापतीपदी शिवसेनेचे संतोष कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीला घवघवीत यश मिळाले होते. २२ सदस्यसंख्या असलेल्या हातकणंगले पंचायत समितीत महायुतीचे तब्बल १७ सदस्य निवडून आल्याने स्पष्ट बहुमत मिळाले आहे.

या पार्श्वभूमीवर सभापती व उपसभापती पदाची निवड आज बिनविरोध पार पडली. खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, जिल्हाप्रमुख रवींद्र माने, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणराव इंगवले तसेच माजी सभापती राजेश पाटील यांच्या पुढाकाराने व सहकार्याने ही निवड प्रक्रिया शांततेत पूर्ण झाली. सभापती व उपसभापती पदासाठीची निवडणूक प्रक्रिया तहसीलदार सुशील बेलेकर व गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी यांच्या अध्यक्षतेखाली हातकणंगले पंचायत समिती सभागृहात पार पडली. निवडीनंतर नूतन सभापती अश्विनी बिरांजे व उपसभापती संतोष कांबळे यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर (संचालक – गोकुळ दूध संघ, कोल्हापूर) यांनी दोघांनाही पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी जि.प. सदस्य अतिश शिंगे, वर्षाताई सावर्डेकर, शिवाजी जाधव, माजी जि.प. सदस्य प्रसाद खोबरे, सरपंच अजिंक्य इंगवले, राजू इंगवले, अनिल बिरांजे, अमर इंगवले, विजय भोसले, अमोल कोरे, झाकीर भालदार, पापा सनदी, गोगा बाणदार, किसन तिरपणकर, आनंदा मोरे यांच्यासह शिवसेना-भाजप महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.