GOOD NEWS- जनऔषधी केंद्रांचा ऑनलाईन उद्घाटन समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, पोखले येथील श्री बलभीम विकास सेवा संस्थेचा समावेश

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

*देशातील विकास सेवा संस्थांमार्फत सुरु होत असलेल्या

पोखले, ता. पन्हाळा येथील श्री बलभीम विकास सेवा संस्थेचा समावेश

कोल्हापूर : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनेअंतर्गत श्री बलभीम विकास सेवा संस्था मर्या. पोखले, ता. पन्हाळा जि. कोल्हापूर या संस्थेसाठी केंद्र मंजूर झाले आहे. देशातील विकास सेवा संस्थांमार्फत सुरु होत असलेल्या पहिल्या प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रांचा ऑनलाईन उद्घाटन समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. येथील स्थानिक कार्यक्रम श्री बलभीम विकास सेवा संस्था, मर्या पोखले, ता. पन्हाळा येथे होणार आहे, अशी माहिती सहकारी संस्थेचे विभागीय सहनिबंधक अरुण काकडे व जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी दिली आहे.

कार्यक्रम वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत व पन्हाळा व शाहूवाडी विधानसभा सदस्य डॉ. विनय कोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन पुणेचे उपाध्यक्ष प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडीक, संजय मंडलिक, धैर्यशील माने यांची विशेष उपस्थिती तर आमदार सर्वश्री सतेज पाटील, जयंत आसगावकर, अरुण लाड, प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, पी.एन.पाटील, राजेश पाटील, राजू आवळे, ऋतुराज पाटील व श्रीमती जयश्री जाधव तसेच सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणेचे सहकार आयुक्त व निबंधक अनिल कवडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार उपस्थित राहणार आहेत.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.