दक्षता जनजागृती सप्ताहास प्रारंभ; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथजिल्हाधिकाऱ्यांच्या उपास्थितीत घेतली शपथ

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

दक्षता जनजागृती सप्ताहास प्रारंभ; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ

कोल्हापूर :
“जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रामाणिकपणा, कायद्याचे पालन आणि पारदर्शकता ठेवणार. लाच घेणार नाही, लाच देणार नाही. जनहितासाठी कार्य करेन आणि भ्रष्टाचाराविरोधात सजग राहीन,” अशी प्रतिज्ञा घेऊन कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात *‘दक्षता जनजागृती सप्ताहा’*चा सोमवारी प्रारंभ झाला.

केंद्रीय सतकर्ता आयोग, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत हा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. भ्रष्टाचारविरोधी जनजागृती निर्माण करून शासनव्यवहारात पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

कार्यक्रमात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ दिली. यावेळी राज्यपाल आणि मुख्यमंत्री महोदयांचा भ्रष्टाचारविरोधी संदेशही वाचून दाखवण्यात आला.

या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, महसूल उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले की —
“भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. कोणतीही लाच मागणारी किंवा देणारी घटना तात्काळ विभागाला कळवावी, हीच खरी नागरिकाची दक्षता आहे.”

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.