कोल्हापूर दक्षिणसाठी माजी आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नातून आणखी दोन कोटींचा निधी…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

अमल महाडिक यांच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमधून समाधान व्यक्त…

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध गावे आणि प्रभागांसाठी भरघोस विकास निधी मिळावा म्हणून माजी आमदार अमल महाडिक सातत्याने प्रयत्नशील आहेत. जलजीवन मिशन योजनेतून गावांना पाणी योजनेसाठी निधी मिळवून दिल्यानंतर आता अमल महाडिक यांनी शहरी भागातील प्रभागांना विकास निधी खेचून आणला आहे. नेहरूनगर,जवाहर नगर, टेंबलाईवाडी, फुलेवाडी, क्रांतिसिंह नाना पाटील नगर, सानेगुरुजी वसाहत, बलराम कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत या प्रभागांसाठी मिळून दोन कोटी रुपयांचा निधी माजी आमदार अमल महाडिक यांच्या विशेष प्रयत्नातून प्राप्त झाला आहे.

या निधीतून प्रभागांमध्ये अंतर्गत सिमेंटचे रस्ते, गटर्स,चॅनल्स बांधणे तसेच रस्ता डांबरीकरणाची कामे करण्यात येणार आहेत. अरुंद गल्ल्यांमध्ये सिमेंट काँक्रीटचे कायमस्वरूपी टिकाऊ रस्ते करून नागरिकांची सोय करावी अशा सूचना महाडिक यांनी केल्या आहेत. मागील काही वर्षात निर्माण झालेला विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं माजी आमदार अमल महाडिक यांनी सांगितलं. पायाभूत नागरी सुविधांबरोबरच विरंगुळा केंद्र, सांस्कृतिक हॉल, ओपन जिम अशा सुविधांची उभारणी करण्यावर भर देणार असल्याचा मानस महाडिक यांनी बोलून दाखवला.

माजी आमदार अमल महाडिक यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न करून कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी लक्षणीय निधी खेचून आणला आहे. समस्यांचा पाठपुरावा करून सोडवणूक करण्यावर भर देणाऱ्या अमल महाडिक यांच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. उपरोक्त प्रभागांसाठी प्राप्त झालेल्या दोन कोटी रुपयांच्या निधीतून लवकरच विकास कामे सुरू होतील.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.