अमृत फार्मास्युटिकल्स आता सिडलर रेमेडीज सोबत वेगवान व्यवसायविस्तार व वाढ अपेक्षित…
कोल्हापूर – अमृत फार्मास्युटिकल्स 85 वर्षापासून हेल्थकेअर उद्योगातील एक अग्रगण्य नाव. अमृत मलम आणि अमृत अडुळसा ही त्यांची उत्पादने पिढ्यानपिढ्या घराघरात वापरात आहेत. त्यांनी आता आपल्या विस्ताराच्या उद्दिष्टांच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. फार्मास्युटिकल क्षेत्रातील पॉवरहाऊस असलेल्या सिडलर रेमेडीजने अमृत फार्मास्युटिकल्सचा संपूर्ण हिस्सा विकत घेतला आहे. अमृत फार्मास्युटिकल्सचा प्रवास त्यामुळे अधिक वेगवान, नव्या प्रॉडक्टससह आणि मोठया बाजारपेठेत सहज पोहोचण्यासाठी सुसज्ज झाला आहे.
सिडलर रेमेडीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री पंकज जैन यांनी दिलेल्या निवेदनानुसार, संपादन प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली आहे आणि जूनपासून व्यवसाय व विस्तारकार्यही सुरू झाले आहे. प्राथमिकरित्या मूळ राज्ये, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि गोवा या राज्यात विस्तार उदिष्ट ठेवले असून. पुढील तीन वर्षांच्या कालावधीत, संपूर्ण भारतामध्ये विस्तार होणे अपेक्षित आहे. बेळगावमधील मूळ उत्पादन युनिटचे कामकाज सांभाळूनच हा विस्तार होणार आहे.
अमृत फार्मास्युटिकल्सला आता सिडलरच्या सामर्थ्याने नवी चालना मिळालेली असून सर्व विक्री क्षेत्रात ती मजबुतीने बाजारपेठेत आपली प्रगती सिद्ध करेल असा विश्वास आहे. अमृत थ्रोट लोझेंजेस आणि पामा लोशन या दोन नव्या उत्पादनासह आता अमृत फार्मास्युटिकल्सची सिडलर रेमेडिजसोबत बाजारपेठेत वेगवान वाटचाल सुरू झाली आहे.
![]() |
![]() |