‘एआय’ हा आर्थिक श्रीमंतीचा सक्षम राजमार्ग – एआय तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

घराघरात एआय बेस्ड पर्सनल कस्टमाईज रोबोट काम करतील… मविप्र केबीटी कॉलेज एआय आणि एडव्हान्सड इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीजने घडे…

नाशिक – ‘एआय’ हा आर्थिक श्रीमंतीचा सक्षम राजमार्ग आहे. यू हेट एआय ऑर यू लव एआय, बट यू कॅन नॉट इग्नोर इट! एआय मध्ये वार्षिक १६७० कोटीच्या नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत.‌ एआय शिकविण्यासाठी चांगले प्राध्यापक उपलब्ध नसतांना देखील पुण्यात काही खासगी संस्था व विद्यापीठ वार्षिक किमान साडेपाच लाख फी घेतली जात आहे. श्रीमंतीच्या स्पर्धेत बहुजन समाजातील गरीबांनी येऊ नये यासाठी पद्धतशीरपणे एआय विषयी गैरसमज पसरविले जात आहेत. एआय साठी इलेक्ट्रॉनिक्स अत्यंत महत्वाचे आहे, मात्र विद्यार्थी सक्षम बनू नये यासाठी काही शक्ती जाणूनबूजून हार्डवेअर व इलेक्ट्रॉनिक्सचे ज्ञान भारतीय विद्यार्थ्यांना मिळू नये या आंतरराष्ट्रीय षडयंत्रात कळत न कळत सामील होत राष्ट्रद्रोही काम करीत आहेत. येत्या काळात घराघरात एआय बेस्ड पर्सनल कस्टमाईज रोबोट काम करतील. एआय ही केवळ संगणकीय गणिताची प्रक्रिया नसून, मानवी बुद्धिमत्ता, निर्णयक्षमता आणि डेटा विश्लेषणाचा संगम आहे. अन्नसुरक्षितेसाठी एआय वापर वाढवत सात टक्क्यांपेक्षा जास्त निधी रिसर्च अॅंड डेव्हलपमेंट मध्ये पब्लीक, प्रायव्हेट पार्टनरशीम मधून खर्च झाल्यास भारताची अर्थ व्यवस्था २०४७ साली ५० ट्रिलीयन डॉलरची पहिल्या क्रमांकाची सक्षम मनुष्यबळाची अर्थव्यवस्था‌ होईल असे प्रतिपादन एआय तज्ज्ञ व मविप्रच्या क. का. वाघ महाविद्यालयात ग्रामीण विद्यार्थ्यांना एआय शिकविणारे प्रा. किरणकुमार जोहरे यांनी केले.

मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कर्मवीर अॅड. बाबुराव गणपतराव ठाकरे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (मविप्र केबीटी-सीओई), नाशिक येथे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि एडव्हान्सड इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीज’ याविषयावर सेमिनार हॉल येथे एआय वर विद्यार्थ्यांना करीयर मार्गदर्शन करतांना प्रा किरणकुमार जोहरे बोलत होते.*दोन आठवडे चालणाऱ्या प्रथम वर्ष तंत्रज्ञानाच्या Induction Program (दिक्षांत कार्यक्रम) मध्ये ते बोलत होते.* कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. आर. देवणे हे होते.

अडीच तासांच्या व्याख्यानात‌, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी इस्रो चेअरमन डॉ. एम जी के मेनन आदींबरोबरच्या वैयक्तिक भेटीतील स्वानुभव देखील प्रा. किरणकुमार जोहरे यांनी विद्यार्थ्यांबरोबर शेअर करत. ‘एआय’ने श्रीमंत बनण्याचा रोडमॅप व इंटरेस्ट नुसार रिलेक्शन क्रायटेरीया त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. डेटा संकलन, प्रक्रिया, मॉडेल प्रशिक्षण, निर्णय घेणे आणि फीडबॅक लूप हे टप्पे समजावून सांगितलेत. चीनमधील एआय बेस्ड रोबोटिक न्यूज अँकर, नागपूरमधील रोबोट रेस्टॉरंट आणि मुंबई‌-बंगळुरूमधील रोबोटिक शिक्षक-प्राध्यापक हे बदल आत्मसाद करीत जागतिक बदलांवर ही त्यांनी भाष्य केले. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालाचा उल्लेख केला. २०२५ पर्यंत एआयमुळे जागतिक स्तरावर ९.५ कोटी नवीन रोजगार निर्माण होतील, तर भारतात एआय तज्ञांचे सरासरी वार्षिक वेतन २४ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. “एआय नोकऱ्या कमी करत नाही, तर नव्या कौशल्याधारित संधी निर्माण करते,” असे सांगत प्रा किरणकुमार जोहरे यांनी विद्यार्थ्यांना संशोधन आणि कौशल्यविकासासाठी प्रोत्साहित केले.

प्रास्ताविक प्रा. सचिन कुशारे यांनी एआय मध्ये करीयर च्या उद्देशाने‌ आयोजित व्याख्यानाचे प्रयोजन स्पष्ट केले. तर आभार डॉ. राहुल वाघ मानले. सूत्रसंचालन प्रा. ए. ए. मालपुरे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर विभाग प्रमुख उपप्राचार्य डॉ. एस. जे. कोकाटे, रजिस्ट्रार प्रा. श्रीमती सृष्टी शिंदे, प्रा. एन. बी. देसले, प्रा. धनंजय बिरार, डॉ. एस. एम. भाटी, प्रा. स्नेहल देवरे, प्रा. श्रीमती एन. आर. काकड, प्रा. श्रीमती जी. बी. बहारे, प्रा. उज्वला चिने आणि विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. या व्याख्यानाला विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

इलेक्ट्रॉनिक्सची कोटीच्या कोटी उड्डाने!

मशीन लर्निंग (एमएल), क्वांटम कॉम्प्युटिंग, ब्रेनटूमशीन इंटरफेस, इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी), स्वॉर्म इंटेलिजन्स, न्यूरोमॉड्युलेशन टेक्नॉलॉजी, न्यूरोमॉर्फिक कॉम्प्युटिंग, हायपर ऑटोमेशन, बायोनिक्स, बायोइन्फॉर्मेटिक्स, जेनरेटिव्ह एआय, क्वांटम क्रिप्टोग्राफी, डिजिटल सेंट टेक्नॉलॉजी, रोबोटिक्स/कोबोटिक्स या एडव्हान्सड इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी वार्षिक ३५ लाख ते एक कोटी रुपये पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध करून देते. सायबर सुरक्षा, फुल स्टॅक डेव्हलपमेंट (एफएसडी), डिजिटल ट्विन्स, सेमिकंडक्टर टेक्नॉलॉजी, फिनटेक, एज कॉम्प्युटिंग, ब्लॉकचेन, डेव्हऑप्स, सिंथेटिक बायोलॉजी या टेक्नॉलॉजीज वार्षिक २५ लाख ते ३५ लाख रुपये पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध करून देते. तर ऑगमेंटेड रिॲलिटी (एआर)/व्हर्च्युअल रिॲलिटी (व्हीआर)/मिक्स रिॲलिटी (एमआर), मेटाव्हर्स, ड्रोन तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, बायोमेडिकल इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅट्रोनिक्स, फोटोनिक्स, ग्रीन इलेक्ट्रॉनिक्स, नॅनोटेक्नॉलॉजी हे किमान वार्षिक ५ लाख ते २५ लाख रुपये पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध करून देते अशी माहिती राष्ट्रीय पातळीवर एआय तज्ज्ञ अशी ओळख असलेल्या प्रा. किरणकुमार जोहरे यांनी दिली.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.