संगमेश्वर पंचायत समिती प्रशासनाकडून साधे चौकशीचे आदेश देखील नाहीत
जि प उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाला संगमेश्वर पंचायत समिती कडून केराची टोपली??
संगमेश्वर — ग्रामपंचायत धामणीने केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या संकेतस्थळावर दाखल केलेले फोटो व माहिती खोटी तसेच दिशाभूल करणारी आहे. शासनाची फसवणूक करणारी आहे असा,आरोप करून त्या संदर्भात गावातील प्रवीण हरिश्चंद्र गुरव यांनी जिल्हा परिषद रत्नागिरी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. त्याची दखल घेऊन जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी गटविकास अधिकारी संगमेश्वर यांना धामणी ग्रामपंचायतिला प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी करण्याचे आदेश दिलें. मात्र याबद्दल आज अखेर पर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्याने गुरव यांनी लेखी तक्रारीत म्हटल्या प्रमाणे उद्या स्वातंत्र्यदिनी उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी धामणी येथील प्रवीण हरिश्चंद्र गुरव हे स्वातंत्र्यदिनी उपोषण करणार असून जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पंचायत समिती (संगमेश्वर) देवरुख यांनी साधे चौकशीचे आदेश सुद्धा देण्याचे सौजन्य आज अखेर दाखवलेले नाही.यामुळे या सर्वांना प्रशासनाची भक्कम साथ आहे व त्यांना उपोषण व्हावे असेच वाटत असल्यामुळे उद्या दिनांक १५ ऑगस्ट२०२५ रोजी प्रवीण गुरव यांचे उपोषण अटळ आहे.व उपोषणावर ते ठाम आहेत.