आबिटकर संकुलातून अष्टपैलू विद्यार्थी घडणार – प्रा.अर्जुन आबिटकर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

आबिटकर नॉलेज सिटी येथे ध्वजारोहन करताना भाई आनंदराव आबिटकर उपस्थित प्रा.अर्जुन आबिटकर आदी मान्यवर…

गारगोटी प्रतिनिधी – पाल (ता.भुदरगड) येथील आबिटकर नॉलेज सिटीमध्ये संकूलामध्ये 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ध्वजारोहण भाई आनंदराव आबिटकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी पाल गावच्या सरपंच सुशिला गुरव व उपसरपंच दिगंबर देसाई प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष प्रा.आबिटकर म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून आबिटकर नॉलेज सिटीची स्थापना करण्यात आलेली आहे. या संस्थेच्या इंजिनीअरींग कॉलेजमधून उत्कृष्ठ इंजिनीअर, कृषी महाविद्यालयातून कृषितज्ञ व अनेक अष्टपैलू खेळाडून बाहेर पडतील असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी अंकूश चव्हाण, माजी ग्रा.पं.सदस्य सर्जेराव मोरे गारगोटी उपसरपंच राहूल चौगले, गारगोटी ग्रा.पं.सदस्य सागर शिंदे, प्रशांत भोई, सदस्या लता चव्हाण, सरिता राऊत, स्मिता पिसे, मेघा भोसले, संध्या कुपटे, विजय सारंग, सुरेश सुर्यवंशी, चंद्रकांत गाडेकर, दशरथ राऊत यांच्यासह प्रमुख मान्यवर, महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक कृषी महाविद्यालयच्या प्राचार्या डॉ.दिपाली गोसावी यांनी केले तर आभार प्रदर्शन इंजिनीअरिंग महाविद्यालयाच्या सौ.स्मिता मोहोळकर यांनी केले आणि सूत्रसंचालन श्री. नंदकुमार निर्मळे यांनी केले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.