शेअर मार्केटच्या माध्यमातून गुंतवणुकीवर मोठा आर्थिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक...
कोल्हापूर – ए एस ट्रेडर्सच्या 28 संचालकावर शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यानं हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने ए एस आणि संलग्न कंपनीच्या काही संचालकांना ताब्यात देखील घेटल. मात्र याचा मुख्य सूत्रधार आणि अन्य संचालक गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते.दरम्यान मंगळवारी पहाटे ए एस ट्रेडर्सचा मुख्य संचालक लोहितसिंग सुभेदार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
![]() |
![]() |
लोहितसिंग सुभेदार आणि त्यांच्या अन्य साथीदारांनी मिळून कोल्हापुरात ए एस ट्रेडर्स नावाने कंपनी सुरू केली. गुंतवणुकीवर मोठा आर्थिक परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवत राज्यभरातून कोट्यवधी रुपये गोळा केले.मोठ्या गुंतवणुकीवर परदेशवारी आलिशान कार अशा भेटवस्तु देवून लोकांना आकर्षित केलं.सुरुवातीला या कंपनीकडून लोकांना दरमहा परतवा देण्यात आला.मात्र 2 वर्षापूर्वी परतावा देणं बंद करण्यात आल.यावेळी ए एस ट्रेडर्सच्या गुंतवणूकदारांनी एकत्र येत 25 नोव्हेंबर 2022 ला शाहूपुरी पोलिसात लोहितसिंग सुभेदारसह एकूण 28 संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यानं हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले.
गुन्हा दाखल झाल्यापासून सुभेदारसह सर्व संचालक पसार झाले त्यांनी जिल्हा तसेच उच्च न्यायालयात अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज देखील केला. मात्र जामीन नाकारल्याने ते पोलिसांना गुंगारा देवून पसार झाले होते. पण आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ए एस ट्रेडर्सचा आणि संलग्न कंपनीचे संचालक आणि एजंट अशा एकूण 8 जणांना जेरबंद केलय. दरम्यान ए एस ट्रेडर्सचा प्रमुख संचालक लोहितसिंग सुभेदार गेल्या वर्षभरापासून व्हिडिओ आणि ऑडिओ मेसेज वरून लोकांना कंपनी परत सुरू करणार असल्याचं सांगत पुन्हा लोकांचा विश्वास संपादन करत होता. दरम्यान आज पहाटे ए एस चा मुख्य संचालक लोहितसिंग सुभेदार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. याबाबत अधिक तपशील समजू शकलेल नाही.