खास मैफली साठी रसिकांना विनामूल्य प्रवेश…
सांगली – जुन्या हिंदी चित्रपट गीतांच्या चाहत्यांसाठी गेली 25 वर्षे सातत्याने विविध सांगितीक उपक्रम सादर करणाऱ्या ‘यादे संगीत क्लब’ या संस्थेच्या रोप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गुरुवारी 1 फेब्रुवारी 2024 रोजी, रात्री नऊ वाजता,भावे नाट्य मंदिर सांगली येथे शाम-ए-गझल ही सुप्रसिद्ध गझल गायक रफिक शेख (बेळगांव/मुंबई)यांची खास मैफिल आयोजित करण्यात आली आहे.
यादे सिने संगीत क्लबच्या संस्थापक अध्यक्ष दिवंगत पद्माताई पुरोहित यांच्या स्मरणार्थ नाक-कान-घसा तज्ञ डॉ. अशोक पुरोहित व कुटुंबीयांच्या सौजन्याने या खास मैफली साठी रसिकांना विनामूल्य प्रवेश असणार आहे. अशी माहिती ‘यादे’चे विद्यमान अध्यक्ष श्रीकांत पाटील व कार्यवाह डाॅ. मंदार करंजवडेकर यांनी दिली आहे.
मेहदी हसन, गुलाम अली, पंकज उदास, जगजीत सिंग अशा अनेक नामवंत गझल गायकांनी अजरामर केलेल्या अनेक लोकप्रिय गजलांचा पुनःप्रत्यय देणाऱ्या रफिक शेख यांच्या या मैफिलीत त्यांना व्हायोलिनची साथ केदार गुळवणी तबला साथ प्रशांत देसाई व सिंथेसायजर ची साथ अविनाश इनामदार हे कसलेले वादक कलाकार करणार आहेत.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यादे’चे संचालक डॉ. सुनील पाटील, डॉ.भरत शहा, डॉ. अनिल मडके, एम के कुलकर्णी, सुनील कोकितकर, महेश कराडकर, शिरीष जोशी, विनायक रसाळ, रमेशभाई शहा, उमा तानशीकर, उमेश भुवा, कुमार मेहता, डॉ. संपदा कानिटकर, प्रा.श्रीराम कानिटकर आदि विशेष प्रयत्न करत आहे.