शिरपुर मर्चंटस को-ऑप बँकेचे मॅनेजर च्या विरुध्द शिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावा…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

दि शिरपूर मर्चंटस् को-ऑप बँक बचाव समितीची मागणी…

शिरपुर – दि शिरपूर मर्चंटस् को-ऑप बँकेचे मॅनेजर संजय कुलकर्णी यांचेवर गुन्हा दाखल करणे बाबत बँक बचाव समितीचे पदाधिकाऱ्यांनी शिरपुर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए. एस. आगरकर यांना 27 ऑक्टोबर रोजी लेखी तक्रार अर्ज दिला आहे. या अर्जात नमूद केले आहे कि, आम्ही बँकेचे सभासद आहोत. बँकेने अनेक प्रकारची असुरक्षित कर्जे दिलेली आहेत.

महाराष्ट्र सहकारी कायदा, उपविधी व रिझर्व बँक ऑफ इंडियाचे सर्व नियम कायदे डावलून या बँकेने कोट्यावधी रुपयांची कर्जे वाटली आहेत. चेअरमन प्रसन्न जयराज जैन यांनी आपल्या सख्ख्या भावाला नियमबाहय कर्ज दिल्याचे स्पष्ट झाल्यानंतर म. जिल्हा उपनिबंधकांनी त्यांस अपात्र ठरविले आहे. तर राकेश रमेश धाकड़ या सभासदास कोणतीही कागदपत्रे न घेता ५० लाख रूपये कर्ज दिले आहे. तसे लेखापरिक्षण अहवालात नमुद केले आहे. ही व अशी अनेक विनातारणी नियमबाह्य कर्ज प्रकरणे असल्याने या बँकेची अत्यंत जास्त 77% थकबाकी वाढली आहे. परीणामी बँकेतील ठेवी व आस्तित्वच धोक्यात आले आहे.संचालक मंडळाने कर्ज मंजुर केले तरी संपूर्ण कागदपत्राची पूर्तता करूनच कर्जदाराला रक्कम देण्याची जबाबदारी पगारी कर्मचारी व मॅनेजर म्हणून संजय कुलकर्णी यांची होती.

त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर करून सभासद व बँकेची मोठी फसवणुक आणि विश्वासघात केला आहे. अनेक संशयास्पद कर्ज प्रकरणांबाबत काही संचालकांनी इतरांच्या नावाने लाखो रूपये कर्ज घेतले असल्या संदर्भात मॅनेजरची कसून चौकशी व्हावी. सबब या सर्व गोष्टीचा सखोल तपास करून मॅनेजर संजय कुलकर्णी यांचेवर बँकेची फसवणुक व कागदपत्रांची अपूर्णता व सभासदांच्या विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

सोबत जोडलेली कागदपत्रे –

१) मा. जिल्हा उपनिबंधकांचे चेअरमन प्रसन्न जयराज जैन यांना नियमबाहय कर्ज दिल्याचा ठपका ठेवून अपात्र केल्याचा आदेश.

२) राकेश रमेश धाकड यांचे पन्नास लाखाचे कर्ज प्रकरणावर सह्या, आणि कोणतेही तारण नसल्याचा लेखा परीक्षकांचा अहवाल.अशी अनेक नियमबाह्य पद्धतीने कर्ज वितरण केले असल्याचे पुरावे सुध्दा प्रसंगी सादर करू असे या बँक बचाव समितीचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.ह्या अर्जावर दि शिरपुर मर्चंटस को-ऑप बँक बचाव समितीचे पदाधिकारी गोपाल कन्हैयालाल मारवाडी, ओंकार चैनसिंग जाधव,हिराभाऊ रामराव कोळी आदींच्या सह्या आहेत. ह्या अर्जात नमूद तक्रारींची चौकशी करून अवश्य कार्रवाई करण्याचे आश्वासन शिरपुर पोलिस निरीक्षक आगरकर यांनी बँक बचाव समितीला दिले आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.