सोळांकूरच्या टोलनाक्यामुळेच १० वर्षे आमदारकी भोगली – ए. वाय. पाटील

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

विनायक जितकर

राधानगरी तालुक्याचा सुरक्षारक्षक व सेवक म्हणूनच राहिलो…

बिद्री – सोळांकूरचा टोलनाका उद्ध्वस्त झाला, असे म्हणणारे के. पी. पाटील यांनी सोळांकूरचा टोलनाका होता म्हणून दहा वर्षे आमदारकीची सत्ता भोगली आता मुधाळचाच टोलनाका निघाल्याने भुदरगड तालुक्यात माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना व मतदारांना आता मला भेटण्यासाठी मोकळीक मिळाली, असे ए. वाय. पाटील यांनी एका पत्रकाद्वारे के. पी. पाटील यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

पत्रकात म्हटले आहे की, के. पी. पाटील यांनी आमदार झाल्यानंतर मतदारसंघात कधीही संपर्क साधला नाही. तसेच भेटावयास आलेल्या एकाही कार्यकत्यांची वा मतदाराची साधी विचारपूसही कधी केली नाही. आमदारकीच्या काळात सर्व कार्यकर्ते तक्रारीचा पाढा आपल्याकडे वाचत होते, त्यावेळी मी स्वतः कार्यकर्त्यांना शांत करण्याचे काम केले आहे. हे कधीही विसरू नका या टोलनाक्यावर केवळ राधानगरी तालुक्याचा सुरक्षारक्षक व सेवक म्हणूनच राहिलो होतो. माझ्यासारख्या प्रमुख कार्यकर्त्याला नेहमी आपण अपमानास्पद वागणूक दिली.

विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीत आपणास राधानगरी तालुक्यातून आम्ही प्रचंड मताधिक्य दिले; मात्र भुदरगड तालुक्यातील मतदारांची आकडेवारी तपासावी, सर्वसामान्य मतदारांनी आपणास नाकारले आहे. बिद्री साखर कारखान्याच्या एका निवडणुकीने हुरळून जाऊ नका. ही निवडणूक जिंकण्यासाठी आपण कोणाला काय काय दिले व काय काय देणार आहात ती वचने पाळा, त्यांनाही फसवू नका.

तालुक्यात माझ्याबरोबर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना माझ्याविषयी खोटेनाटे सांगून मतभेद निर्माण करण्याचे काम आपण केले. एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता मोठा होऊ पाहत असल्यास त्याची गळचेपी कशी करायची आपली जुनी पद्धत अनेकांना माहीत आहे. कार्यकर्त्यां मध्ये वाद विवाद लावण्याचे काम करून आपली राजकीय पोळी कशी भाजली जाईल एवढाच विचार आपण केला आहे. आता कोण योग्य हे येणारा काळच ठरवेल असे ए. वाय. पाटील म्हणाले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.