दुधगंगा डावा व उजव्या कालव्यामधून पाणी उपसा बंदी…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

दुधगंगा कालव्यामधून पाणी उपसा करणा-या सर्व योजनांवर 19 व 20 डिसेंबर रोजी उपसा बंदी…

कोल्हापूर – दुधगंगा नदीच्या डावा व उजव्या कालव्याच्या दोन्ही तीरावरील सिंचनासाठी व बिगर सिंचन (औद्योगिक) पाणी वापरणा-या कोल्हापूर जिल्ह्यातील लाभधारक बागायतदार / सह. पाणी पुरवठा संस्थां तसेच औद्योगीक पाणी वापरणारे ग्राहक यांच्यासाठी दुधगंगा कालव्यामधून पाणी उपसा करणा-या सर्व योजनांवर 19 व 20 डिसेंबर रोजी उपसा बंदी करण्यात आली आहे. परिस्थितीनुसार पुढील आदेश स्वतंत्रपणे निर्गमित केले जातील, असे कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर),च्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी कळविले आहे.

जिल्ह्यातील राधानगरी, भुदरगड व करवीर तालुक्यामधून पाणी कालव्याच्या शेवटच्या भागापर्यंत कमी कालावधीत व पाण्याची बचत करुन पोहचविणे गरजेचे असल्याने, अपरिहार्य कारणास्तव उपसाबंदी राबवावी लागत आहे. तरी जिल्हयातील राधानगरी, भुदरगड व करवीर तालुक्यामधील लाभधारक बागायतदार / सह. पाणी पुरवठा संस्थां तसेच औद्योगीक पाणी वापरणारे ग्राहक यांनी लाभक्षेत्रामधील लाभधारक बागायतदार / सह. पाणी पुरवठा संस्थां यांनी सद्यपरिस्थितीचा जाणिवपूर्वक विचार करुन जलसंपदा विभागास सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.