![]() |
पुणे येथील दिग्दर्शक सुनिल नाईक करणार मार्गदर्शन
कोल्हापूर- प्रतिनिधी —शिवाजी विद्यापीठाच्या एम. ए. मास कम्युनिकेशन आणि पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने शनिवार दि. 9 रोजी चित्रपटविषयक एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे. पुणे येथील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पडद्यामागची गोष्ट या पुस्तकाचे लेखक सुनिल नाईक ‘स्क्रीप्ट टू स्क्रीन’ या विषयावर कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.
पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या इमारतीत सकाळी साडेदहा वाजता कार्यशाळेचे उद्घाटन होईल. दुपारी साडेचार वाजता समारोप होईल. ही कार्यशाळा विनामूल्य असून सर्वांसाठी खुली आहे. कार्यशाळेत सहभागींना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सहभागी होऊ इच्छिणार्यांनी नाव नोंदणी करण्यासाठी https://forms.gle/
|













































